HomeHealth A-ZCardiologyAll About High cholesterol

All About High cholesterol

उच्च कोलेस्ट्रॉलबद्दल आवश्यक असलेली सर्व माहिती

कोलेस्टेरॉल काय आहे?

कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरात तयार होणारा एक मेंचट/चिकट घटक असतो. तो प्रत्येकाच्याच शरीरात असतो. चांगल्या आरोग्यासाठी तो आवश्यकही आहे, परंतु काही व्यक्तींमध्ये याचे प्रमाण खूप जास्त असते. ज्या व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते त्यांना स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि इतर आजारांचा धोका कमी कोलेस्टेरॉल असणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असतो. कोलेस्टेरॉलची तुमची पातळी जितकी जास्त तितकी तुमची जोखीम जास्त.
कोलेस्टेरॉलचे वेगवेगळे प्रकार आहेत का?
होय, कोलेस्टेरॉलचे भिन्न प्रकार आहेत. तुम्ही चाचणी करून घेतल्यास तुमचे डॉक्टर तुमच्याशी पुढील गोष्टींबाबत बोलू शकतात –

 • एकूण कोलेस्टेरॉल
 • एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटिन) कोलेस्टेरॉल – यालाच वाईट कोलेस्टेरॉल असेही म्हणतात. कारण हे तुमच्या ह्रदयाच्या रोहिण्यांमध्ये साचत जाते आणि हृदय विकाराची जोखीम वाढते.
 • एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन) कोलेस्टेरॉल – यालाच चांगले कोलेस्टेरॉल असेही म्हणतात. कारण एचडीएलची पातळी जास्त असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर आरोग्याच्या समस्यांची जोखीम कमी असते.
 • नॉन-एचडीएल कोलेस्टेरॉल – नॉन-एचडीएल कोलेस्टेरॉल म्हणजे तुमचे एकूण कोलेस्टेरॉल वजा तुमचे एचडीएल कोलेस्टेरॉल.
 • ट्रायग्लिसेराईड्स – ट्रायग्लिसेराईड्स म्हणजे कोलेस्टेरॉल नसते. ही दुसऱ्या प्रकारची चरबी असते परंतु कोलेस्टेरॉलचे मापन करताना याचेही मापन केले जाते. (ट्रायग्लिसेराईड्सचे प्रमाण जास्त असल्यामुळेही हृदयविकार आणि स्ट्रोकची जोखीम वाढत असल्याचे दिसते.)

माझे आकडे किती असले पाहिजेत?
तुमच्या कोलेस्टेरॉलचे आकडे किती असावे याबाबत तुमच्या डॉक्टर किंवा परिचारिकेशी बोला. वेगवेगळ्या लोकांसाठी हे आकडे वेगवेगळे असू शकतात. सहसा हृदयाचे कोणतेही आजार नसलेल्या लोकांचे पुढील प्रमाणे आकडे असणे अपेक्षित आहे –

 • एकूण कोलेस्टेरॉल २०० हून कमी
 • एलडीएल कोलेस्टेरॉल १३० हून कमी –किंवा जर ह्रदयविकार अथवा स्ट्रोकची जोखीम असेल तर खूप कमी
 • एचडीएल कोलेस्टेरॉल ६० हून जास्त
 • नॉन-एचडीएल कोलेस्टेरॉल १६० हून कमी , जर ह्रदयविकार अथवा स्ट्रोकची जोखीम असेल
 • ट्रायग्लिसेराईड्स १५० हून कमी

लक्षात ठेवा जरी ही ध्येये गाठता न येऊनही अनेक लोकांना हृदयविकार आणि स्ट्रोकची जोखीम कमी असते.
जर माझ्या डॉक्टरांनी सांगितले की माझे कोलेस्टेरॉल जास्त आहे तर मी काय करावे?
तुमच्या डॉक्टरांना विचारा की तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याची एकूण जोखीम किती आहे? कोलेस्टेरॉल जास्त असणे हे नेहमीच काळजीचे कारण नसते. ह्रदय विकार किंवा स्ट्रोकची तुमची जोखीम वाढवण्यास जबाबदार असलेल्या अनेक गोष्टींपैकी, उच्च कोलेस्टेरॉल ही एक गोष्ट आहे. तुमची जोखीम वाढवण्यात पुढील घटकांचा समावेश होतो –

 • धूम्रपान
 • उच्च रक्तदाब
 • तुमचे पालक किंवा भावंडांपैकी कोणाला तरुण वयात, म्हणजे पुरुषांमध्ये ५५ वर्षाच्या आधी आणि स्त्रियांमध्ये ६५ वर्षांच्या आधी हृदय विकार झाला असणे
 • हृदयासाठी पौष्टिक आहार न घेणे – “पौष्टिक आहार” म्हणजे ज्यामध्ये भरपूर फळे, भाज्या, तंतूमय पदार्थ आणि पौष्टिक स्निग्धांशांचा समावेश होतो (जसे की, मासे व ठराविक तेलांतून मिळणारे स्निग्धांश). तसेच साखर आणि नकोसे स्निग्धांश मर्यादित ठेवण्याचाही यात समावेश होतो.
 • वृद्धावस्था

जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याची जोखीम जास्त असेल तर कोलेस्टेरॉल जास्त असणे ही तुमच्यासाठी एक समस्या आहे. या विरुद्ध जर तुम्हाला ही कमी जोखीम असेल तर कोलेस्टेरॉलसाठी उपचारांची गरज कदाचित भासणार नाही.

मी माझी वाढलेल्या कोलेस्टेरॉलची पातळी कशी कमी करावी?

तुमचे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला जीवन शैलीमध्ये काही बदल करावे लागू शकतात. यासाठी पुढे काही सूचना दिलेल्या आहेत.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मी औषध घ्यावे का?
कोलेस्टेरॉल जास्त असलेल्या सर्वांनाच औषधे घ्यावी लागत नाहीत. परंतु, तुमचे वय, कौटुंबिक इतिहास आणि आरोग्याच्या इतर समस्यांनुसार तुम्हाला औषधाची गरज आहे का ते मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा डॉक्टर ठरवतील.
पुढील बाबतीत तुम्हाला कोलेस्टेरॉल कमी करणारे औषध, स्टॅटिन घ्यावे लागू शकते –

 • तुम्हाला आधीच हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आलेला असेल.
 • हृदय विकार असल्याचे ज्ञात आहे.
 • मधुमेह आहे.
 • पेरिफेरल आर्टरी डिसीज आहे, यामध्ये तुमच्या पायातील नसांमध्ये स्निग्ध पदार्थ जमा होतो आणि त्यामुळे चालताना वेदना होतात.
 • ऍबडॉमिनल अरोटिक एन्युरीसिम आहे, ज्यामध्ये पोटाची मुख्य रोहिणी रुंद होते.

वरीलपैकी कोणतीही स्थिती असलेल्या बहुतांश लोकांना, त्यांची कोलेस्टेरॉलची पातळी कितीही असली तरी स्टॅटिन घ्यावे लागते. जर तुमच्या डॉक्टर केव्हा परिचारिकेने तुम्हाला स्टॅटिन घेण्यास सांगितले असेल तर ते चालू ठेवा. त्यामुळे तुम्हाला काहीही वेगळे जरी जाणवले नाही तरी त्यामुळे हृदयविकाराचा झटका स्ट्रोक आणि मृत्यूला प्रतिबंध होण्यास मदत होते.

औषधे न घेता मला माझे कोलेस्टेरॉल कमी करता येईल का?

होय, पुढील गोष्टींनी तुम्हाला तुमचे कोलेस्टेरॉल थोडे कमी करता येऊ शकते:

 • हृदयासाठी पौष्टिक आहार घेणे: स्निग्धांशयुक्त दुग्ध उत्पादने आणि मांस यामध्ये आढळणारी संपृक्त मेदाम्ले कमी करा.
 • कुकीज, क्रॅकर्स आणि केक्स यांसारख्या बेकरी उत्पादनांमध्ये आढळणाऱ्या ट्रान्स फॅट्स बंद करा. भरपूर ओमेगा-३ असलेल्या पदार्थांचे सेवन करा जसे की मासे, अक्रोड आणि जवस. द्राव्य तंतूंचे प्रमाण वाढवा, जसे की ओटमील, मोड आलेली कडधान्ये, चवळी, नासपती आणि सफरचंद.
 • जास्त सक्रिय राहा: तुमच्या शारीरिक हालचाली वाढवा. आठवड्यातून निदान तीन दिवस व्यायाम करा.
 • धूम्रपान बंद करा: धूम्रपान बंद केल्याचे लगेच फायदे मिळतात. त्यामुळे एचडीएल अर्थात “चांगल्या” कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
 • वजन कमी करा (जर तुम्ही लठ्ठ असाल): वजन जास्त असल्यामुळे एलडीएल अर्थात “वाईट” कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.

या गोष्टींमुळे जरी तुमच्या कोलेस्टेरॉलमध्ये थोडासाच फरक होत असला तरी, त्यामुळे तुमचे आरोग्य अनेक प्रकारे सुधारते. परंतु, जर तुमच्या डॉक्टरांनी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी औषध सांगितले तर ते जरूर घ्या. जीवनशैलीत वरील बदल करून नियमितपणे औषधे घ्या. त्यामुळे तुमच्या औषधाची मात्रा कमी करण्यास मदत होऊ शकते.

तुम्ही सर्वसमावेशक ह्रदयाची तपासणी करावी अशी शिफारस केली जाते. यामध्ये कोलेस्टेरॉलशी निगडीत ह्रदयाच्या कोणत्याही घटना टाळण्यासाठी, नियमित मध्यांतरांनी लिपिड प्रोफाईल रक्त चाचण्यांचा समावेश होतो.

Avatar
Verified By Apollo Cardiologist

The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 200 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content

Quick Appointment
Most Popular

Breast Cancer: Early Detection Saves Lives

Do Non-smokers Get Lung Cancer?

Don’t Underestimate the Risk: The Truth About Sudden Cardiac Arrest in Young People

Life after One Year Coronary Artery Bypass Graft (CABG) Surgery: A Journey of Recovery and Renewed Health.

Book ProHealth Book Appointment
Request A Call Back X
52.172.5.58 - 1