HomeLiver careALL YOU NEED TO KNOW ABOUT LIVER FAILURE

ALL YOU NEED TO KNOW ABOUT LIVER FAILURE

Do not ignore your symptoms!

Find out what could be causing them

Start Accessment

यकृत का महत्त्वाचे आहे?

शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव असलेले यकृत हे जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याची अनेक महत्त्वाची कार्य आहेत –

  • पचनाला मदत करणारे पित्त, अर्थात रसायनांचे एक मिश्रण तयार करणे.
  • अन्नाचे पचन करून त्यातून उर्जा निर्माण करणे.
  • रक्तातील धोकादायक घटक काढून संक्रमणाशी लढण्यास मदत करणे.
  • रक्ताची गुठळी होण्यासाठी महत्त्वाची असणारी रसायने तयार करणे.
  • लोह, जीवनसत्वे आणि इतर आवश्यक घटक साठवून ठेवणे.

यकृताचा मोठा भाग दुरुस्त करण्याच्या पलीकडे खराब होतो आणि यकृताचे कार्य थांबते, तेव्हा ते बंद पडते.
यकृत बंद पडणे ही एक जीवघेणी स्थिती असून यासाठी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी लागते. बहुतेक वेळा यकृत हळूहळू आणि अनेक वर्षांच्या काळात बंद पडते. परंतु दुर्मिळ परिस्थितीमध्ये ज्याला अॅक्युट लिव्हर फेल्युअर म्हणतात, यामध्ये यकृत वेगाने (अर्थात 48 तासात बंद पडते) आणि सुरुवातीलाच याचे निदान करणे अवघड असू शकते.

यकृत कशामुळे बंद पडते?

क्रॉनिक लिव्हर फेल्युअरची सर्वात सामान्य कारणे म्हणजे (ज्यामध्ये काही महिने किंवा वर्षांमध्ये यकृत बंद पडते) –

  • हेपिटायटीस बी
  • हेपिटायटीस सी
  • दीर्घकाळ अल्कोहोलचे सेवन करणे
  • सिरॉसिस
  • हिमोक्रोमाटोसिस (एक अनुवंशिक विकार ज्यामध्ये शरीर खूप जास्त प्रमाणात लोह शोषून घेते आणि साठवून ठेवते)
  • कुपोषण

अॅक्युट लिव्हर फेल्युअरची कारणे अनेकदा भिन्न असतात, यामध्ये यकृत वेगाने बंद पडते. यामध्ये समावेश होतो –

  • ऍसेटामिनोफेनची (टायलिनॉल) जास्त मात्रा
  • हेपेटायटिस ए, बी आणि सी यांसह विषाणू (विशेषतः लहान मुलांमध्ये)
  • विहित केलेली ठराविक औषधे व वनौषधीना प्रतिक्रिया
  • विषारी जंगली आळंबीचे सेवन

यकृत बंद पडल्याची काय लक्षणे आहेत?

यकृत बंद पडल्याची प्रारंभीची लक्षणेकोणत्याही स्थितीमुळे असू शकतात. त्यामुळे सुरुवातीला यकृत बंद पडल्याचे निदान करणे अवघड असते. प्रारंभिक लक्षणांत समावेश होतो:

  • मळमळणे
  • भूक न लागणे
  • थकवा
  • अतिसार

परंतु यकृत बंद पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंती जशा वाढत जातात तशी लक्षणे गंभीर होत जातात आणि त्यांवर तातडीने उपचार करण्याची गरज भासते. ही लक्षणे पुढीलप्रमाणे –

  • कावीळ
  • सहज रक्तस्राव होणे
  • पोटाला सूज येणे
  • स्थितीभान न राहणे किंवा मानसिक गोंधळ (याला हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी म्हणतात)
  • झोपाळूपणा
  • कोमा

यकृत बंद पडण्यावर कसे उपचार केले जातात?

पुरेसे लवकर निदान झाल्यास, ऍसेटामिनोफेनची जास्त मात्रा दिल्यामुळे झालेल्या अॅक्युट लिव्हर फेल्युअरवर कधीकधी उपचार करता येतात आणि त्याचे प्रभाव उलटवता येतात. तसेच जर एखाद्या विषाणूमुळे यकृत बंद पडले असेल तर यकृताचे थोडे फार कार्य चालू असेपर्यंत लक्षणांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये कधीकधी यकृत आपले आपण बरे होते.
दीर्घकाळ ऱ्हास झाल्यामुळे बंद पडलेल्या यकृतासाठी प्रारंभिक उपचार म्हणजे यकृताचा अजून जो भाग कार्यरत आहे तो वाचवण्याचे असतात. ते शक्य नसल्यास यकृत रोपण करावे लागू शकते. सुदैवाने यकृत रोपण ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि ती बहुतेकदा यशस्वी होते.

यकृत बंद पडण्यास कसा प्रतिबंध केला जाऊ शकतो?

यकृत बंद पडण्यास प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सिऱ्हॉसिस किंवा हेपिटायटीस होण्याची जोखीम टाळणे. या स्थितीला प्रतिबंध करण्यासाठी पुढील गोष्टी मदत करू शकतात –

  • हेपेटाइटिस ए किंवा बी ला प्रतिबंध करण्यासाठी हेपिटायटीसची लस किंवा इम्युनोग्लोबुलिचे इंजेक्शन घ्यावे.
  • सर्व अन्न गटांचा समावेश असलेला समतोल आहार घ्यावा.
  • मद्यपान प्रमाणात ठेवावे. ऍसेटामिनोफेनची (टायलिनॉल) घेत असताना मद्यपान टाळावे.
  • योग्य ती स्वच्छता राखावी. सहसा जंतूंचा प्रसार हातांमधून होत असल्यामुळे शौचालयास जाऊन आल्यानंतर हात व्यवस्थित धुवावे. तसेच कोणत्याही खाद्यपदार्थाला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
  • रक्त किंवा रक्ताशी संबंधित कोणतीही उत्पादने हाताळू नयेत.
  • टूथब्रश आणि रेझरसह वैयक्तिक प्रसाधन घटक कोणाबरोबरही वाटून घेऊ नयेत.
  • जर तुम्ही टॅटू करून घेतला किंवा शरीरावर टोचून घेण्याची प्रक्रिया करून घेतली तर त्याची उपकरणे स्वच्छ व निर्जंतुक असल्याची खात्री करा (आजार उत्पन्न करणाऱ्या सूक्ष्मजिवांपासून निर्जंतुक केलेली)
  • शरीर संबंधांच्या वेळी संरक्षण (काँडम) वापरा
  • तुम्ही शिरेतून घेण्याची बेकायदेशीर औषधे घेत असाल तर त्याच्या सुया कोणाबरोबरही सामायिक करू नका.

Avatar
Verified By Apollo General Physician
Our expert general medicine specialists verify the clinical accuracy of the content to deliver the most trusted source of information, making the management of health an empowering experience.
Previous articleAll About High cholesterol
Next articleAre Fats Good
Quick Appointment
Most Popular

Breast Cancer: Early Detection Saves Lives

Do Non-smokers Get Lung Cancer?

Don’t Underestimate the Risk: The Truth About Sudden Cardiac Arrest in Young People

Life after One Year Coronary Artery Bypass Graft (CABG) Surgery: A Journey of Recovery and Renewed Health.

Book ProHealth Book Appointment
Request A Call Back X
52.172.5.58 - 1