logo
Home Ortho Care Back Pain

Back Pain

Verified By Apollo Orthopedician June 23, 2020 3787 0
reason for back pain
reason for back pain

पाठदुखी कशामुळे होते

विहंगावलोकन

जगभरामध्ये विविध जनसांख्यिकीय आणि जीवनशैलीची पार्श्वभूमी असलेले लोक अनुभवत असलेल्या समस्यांपैकी पाठदुखी ही सामान्य आहे. सध्या, अनेक उद्योगांतील व्यावसायिकांना या समस्येने हैराण केले आहे. तथापि, सॉफ्टवेअर व्यावसायिकांमध्ये कंबरदुखी सर्वात सामान्य आहे. याचे कारण म्हणजे, प्रामुख्याने त्यांचे कामाचे स्वरूप, सुदृढतेच्या समस्या आणि जीवनशैली.

हालचाली, इजा आणि काही वैद्यकीय समस्यांमुळे पाठदुखी होऊ शकते. कोणत्याही वयाच्या लोकांना, विविध कारणांमुळे याचा त्रास होऊ शकतो. वयाबरोबर, कंबरदुखी होण्याची शक्यता वाढते, यामध्ये आधी केलेले काम आणि मणक्याच्या चकत्यांची झीज हे घटक असू शकतात.

बहुतांश पाठदुखीचे मूळ यांत्रिक असते, म्हणजे पाठीवर वारंवार ताण येण्यामुळे पाठदुखी होते. अवघड किंवा एकाच स्थितीत राहणे, खूप वेळ एका जागी बसणे, पुढे वाकणे, उभे राहणे आणि जड भार वाहणे अशा काही कारणांमुळे कंबरेमध्ये उसण भरू शकते.

मणक्यातील चकत्या, मज्जारज्जू आणि चेतापेशी, पाठीच्या कण्याचा खालचा भाग, चकत्या आणि कण्याच्या आसपासचे अस्थिबंध, कंबरेचे स्नायू आणि कण्याच्या आसपासची त्वचा यांच्याशी कंबरदुखी संबंधित असू शकते.

कण्याचा दाह, छातीत गाठ आणि महाधमनीचे विकार यामुळे पाठीचा वरचा भाग दुखू शकतो.

कारणे

हाडे, स्नायू, कंडरा आणि अस्थिबंधनांच्या गुंतागुंतीच्या रचनेतून आपली पाठ तयार झालेली असते जी आपल्या शरीराला आधार देते आणि त्यामुळे आपल्याला हालचाल करता येते. पाठदुखीची अनेक कारणे आहेत, परंतु काही प्रकरणांमध्ये पाठदुखीची कारणे अस्पष्ट राहतात.

तणाव, ताण किंवा इजेतून सामान्यपणे पाठदुखी उद्भवते. तसेच, आपल्या पाठीच्या कण्यामध्ये चकत्या, कूर्चा यांसारख्या गाद्यांचा आधार दिलेला असतो. यांपैकी कोणत्याही घटकामध्ये समस्या आल्यास त्यामुळे पाठदुखी होऊ शकते. चकत्यांना नुकसान झाल्यास त्यामुळे वैद्यकीय स्थिती उद्भवू शकतात, ताणामुळे शारीरिक ठेवण बदलू शकते. ओस्टिओपोरोसिस (अस्थीची घनता कमी होणे) यांसारख्या पाठीच्या कण्याच्या समस्यांमुळेही पाठदुखी होऊ शकते.

ताण

पाठदुखीची सामान्य कारणे –

 • स्नायूंमध्ये पेटके येणे
 • स्नायूंतील तणाव
 • पडणे, अस्थिभंग किंवा इजा
 • अस्थिबंधने किंवा स्नायूंवरील ताण
 • चकत्यांना नुकसान पोहोचणे

पुढील हालचालींमुळे ताण किंवा पेटके येऊ शकतात –

 • खूप जड सामान उचलणे
 • अयोग्यरित्या सामान उचलणे
 • अचानक आणि विचित्र हालचाली करणे
 • रचनात्मक स्थिती

रचनात्मक स्थिती

अनेक रचनात्मक स्थितींमुळे पाठदुखी होऊ शकते, यामध्ये समावेश होतो –

 • चकत्यांना फुगवटा येणे – आपल्या कण्याच्या मणक्यांमध्ये चकत्यांची गादी असते. जर चकतीला फुगवटा आला किंवा ती फुटली तर त्यामुळे तंतुकींवरील दाब वाढतो.
 • फुटलेल्या चकत्या – चकत्यांना फुगवटा येण्याप्रमाणेच, फुटलेल्या चकतीमुळे तंतुकींवरील दाब वाढतो.
 • सायटिका: अंतर्गळ (हर्निया) किंवा चकतीला फुगवटा आल्यामुळे तंतुकीवर दाब येऊन नितंबापासून पायाच्या मागून खाली जाणारी जोरदार, तीव्र वेदना.
 • संधिवात: संधिवातामुळे कंबर, नितंब आणि इतर ठिकाणच्या सांध्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. काही मोजक्या प्रकरणांमध्ये, कण्याच्या स्टेनोसिसमुळे पाठदुखी होऊ शकते, स्टेनोसिसमध्ये मज्जारज्जू भोवतीची जागा अरुंद होते.
 • मूत्रपिंडाच्या समस्या: मूत्रपिंडाचे संक्रमण किंवा मुतखड्यांमुळे पाठदुखी होऊ शकते.

हालचाली व ठेवण

रोजच्या काही हालचाली किंवा अयोग्य ठेवण यामुळे सुद्धा पाठदुखी होऊ शकते. उदाहरणार्थ, खूप जास्त खाली वाकणे किंवा संगणक वापरताना खूप कुबड काढून बसण्यामुळे कालांतराने खांदे व पाठीच्या वेदना वाढू शकतात. इतर उदाहरणांमध्ये समावेश होतो:

 • शिंकणे किंवा खोकणे
 • इकडे तिकडे वळणे
 • खूप जास्त ताणणे
 • दीर्घकाळ बसणे किंवा उभे राहणे
 • दीर्घकाळ पुढे वाकणे किंवा अयोग्य प्रकारे वाकणे
 • एखादी गोष्ट ओढणे, ढकलणे, वाहून नेणे किंवा उचलणे
 • मान पुढे वाकवून ठेवल्याने ताण येणे (संगणक वापरताना किंवा वाहन चालवताना)
 • न थांबता दीर्घकाळ वाहन चालवणे
 • शरीराला आधार न देणाऱ्या आणि कणा सरळ न ठेवणाऱ्या गादीवर झोपणे

इतर कारणे

काही वैद्यकीय स्थितींमुळेही पाठदुखी होऊ शकते.

 • नागीण (शिंगल्स): नागीण हे तंतुकींना होणारे विषाणूजन्य संक्रमण असते ज्यामुळे वेदनादायक पुरळ येते. कोणती तंतुकी प्रभावित झाली आहे त्यानुसार, पाठदुखी होऊ शकते.
 • निद्रा विकार निद्रा विकार असलेले लोक इतरांपेक्षा पाठदुखीला जास्त प्रवण असतात आणि त्यांना पाठदुखीचा जास्त त्रास होतो.
 • कण्याचे संक्रमण: तापामुळे पाठीच्या कण्याला संक्रमण होऊन पाठदुखी होऊ शकते. तसेच, पाठीच्या कण्याला संक्रमण झाल्यामुळे, पाठीतील मऊ, उबदार भागामध्ये वेदना होऊन पाठदुखी होऊ शकते.
 • पाठीच्या कण्याचा कर्करोग: पाठीच्या कण्यावर कर्करोगाची गाठ निर्माण होऊन तंतुकीवर त्याचा दबाव येतो आणि त्यामुळे पाठदुखी होऊ शकते.
 • कौडा इक्विना सिंड्रोम: पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाला असलेला तंतुकींचा गुच्छ, कौडा इक्विनाला नुकसान पोहोचल्यास हे होऊ शकते. यामध्ये नितंबांचा वरचा भाग व कंबरेत वेदना होणे, मांड्या, जननेंद्रिये आणि नितंब बधीर होणे ही लक्षणे दिसतात. या स्थितीमुळे कधीकधी मूत्राशय आणि आतड्याच्या कार्यात अडथळा येतो.
 • इतर संक्रमणे: मूत्रपिंड, मूत्राशयाची संक्रमणे किंवा कटिप्रदेशाचा दाह होणारा आजार यामुळेही पाठदुखी होऊ शकते.

पाठदुखी टाळता येते

शरीराचे योग्य गतीशास्त्र वापरून आणि शरीराच्या स्थितीमध्ये सुधारणा करून तुम्ही पाठदुखी टाळू शकता व पुन्हा होण्यास प्रतिबंध करू शकता. खालील कृतींद्वारे तुम्ही तुमची पाठ निरोगी आणि बळकट ठेवू शकता:
व्यायाम. कमी प्रभावाच्या अॅरोबिक हालचालींनी सुरुवात करा व चालू ठेवा (त्यामुळे तुमच्या पाठीवर ताण येऊ नये किंवा तिला झटका बसू नये). यामुळे तुमच्या पाठीची सहनशक्ती आणि शक्ती वाढण्यास मदत होते आणि स्नायूंचे कार्य सुधारते. पोहोणे किंवा चालणे हे चांगले पर्याय आहेत. तुम्ही कोणत्या हालचाली करू शकता याबाबत तुमच्या डॉक्टरांशी बोला.
स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढवा. तुमच्या शरीराचा मुख्य गाभा बळकट करणाऱ्या पोटाच्या व पाठीच्या स्नायूंपासून सुरुवात करू शकता. त्यामुळे स्नायूंची स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि ते पाठ बळकट करण्यासाठी कार्य करू शकतील. तुमच्यासाठी कोणते व्यायाम योग्य ठरतील ते तुमचे डॉक्टर किंवा शारीरिक उपचारकर्ता सांगू शकतात.
योग्य वजन राखा: लठ्ठ किंवा जास्त वजन असल्यामुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. जर तुमचे वजन जास्त असेल तर, वजन कमी करण्यामुळे पाठदुखीला प्रतिबंध होऊ शकतो.

निष्कर्ष

तुम्हाला पाठदुखीचा त्रास असो वा नसो, पाठीला ताण आणणाऱ्या किंवा वेडेवाकडे वळवायला लावणाऱ्या हालचाली टाळा. शरीराचा योग्य वापर करा. नीट उभे राहा, नीट बसा, नीट वजन उचला आणि पाठ सरळ ठेवा. तसेच, वारंवार होणारी पाठदुखी टाळण्यासाठी किंवा तिला प्रतिबंध करण्यासाठी दर अर्ध्या तासाने स्थिती बदला.

Verified By Apollo Orthopedician

Our dedicated team of Orthopedicians who are engaged in treating simple to complex bone and joint conditions verify and provide medical review for all clinical content so that the information you receive is current, accurate and trustworthy

Avatar
8000+ Top doctors Associated and Apollo Hospitals is continuosly ranked as No1 Multispecialty Hospitals in India with best in class treatments for Cancer, Knee replacements, Liver Transplant, Heart, Diabetes, Kidney.

Quick Appointment

SEND OTP

PRO HEALTH

Book ProHealth Book Appointment
Request A Call Back X