मानवी इतिहासात कधीही झाली नव्हती इतकी प्रगती गेल्या शंभर वर्षांमध्ये औषधांमध्ये झाली आहे. परिणामी, आज आपण जास्त सुदृढ आहोत आणि पूर्वीपेक्षा खूप जास्त जगतो. लशीकरणामुळे आता, देवी सारख्या लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या आजारांचे पूर्णपणे निर्मूलन झाले आहे. क्षयरोगासारख्या भयंकर आजारांवर आता प्रतिजैविकांचे यशस्वी उपचार करता येतात. पौष्टिक आहार आणि सक्रिय जीवनशैलीमुळे मधुमेह, ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या आजारांमुळे होणाऱ्या विकृती व मृत्यू कमी झाले आहेत.
या अतिशय सकारात्मक आरोग्यसेवेच्या वातावरणातही एका आजारावर अजून मात करता आलेली नाही. मेंदूचा प्राथमिक कर्करोग आजही आपल्याला वाकुल्या दाखवतो आहे. मेंदूतील गाठींमुळे लहान मुले आणि प्रौढ दोघेही प्रभावित होऊ शकतात आणि याचे अनेक प्रकार आहेत. मस्तिष्कावरण, अर्थात मेंदूवरील आवरणाच्या गाठी सहसा सौम्य असतात आणि शस्त्रक्रियेने त्या आता पूर्णपणे बऱ्या करता येतात. लहान मुलांमधील गाठी या कर्करोगाच्या किंवा सौम्य असू शकतात परंतु प्रौढांना प्रभावित करणाऱ्या कर्करोगापेक्षा याचे रोगनिदान खूपच बरे असते. तथापि, प्रौढांमध्ये, मेंदू व मज्जारज्जूच्या संयुक्त पेशीजालातील गाठी, (या मेंदूतील पेशी असतात आणि मज्जातंतूंना आधार देतात व त्यांचे पोषण करतात), यांना ग्लायोमा असेही म्हणतात, त्या सहसा, खूपच वाईट निष्पत्ती देतात. बिकटतेच्या ‘प्रमाणानुसार’ १-४ च्या मापनपट्टीवर दिला जाणारे ग्लायोमा आणि ग्लायोब्लास्टोमा (दर्जा ४) हे सर्वात सामान्य असून त्यांची निष्पत्ती अत्यंत वाईट असते. लाखात ५ लोकांना ग्लायोब्लास्टोमा प्रभावित करतो आणि उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम उपचारांद्वारे ९-१४ महिन्यांपर्यंत जगण्याची शक्यता असते, ज्यामध्ये हळूहळू प्रकृती खालावत जाते.
तथापि, सर्वच काही गमावलेले नाही आणि या भयंकर आजारावर उपचार शोधण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून आटोकाट प्रयत्न केले गेले आहेत. पेशींची अनेक पट होण्यावर नियंत्रण ठेवणे व थांबवणे यासाठी असलेल्या नियंत्रण व संतुलनांना चकवा देणाऱ्या पेशींच्या अनियंत्रित वृद्धीमुळे सर्व कर्करोग होत असतात. जनुकीय संकेतांकातील उत्परिवर्तनामुळे (बदलामुळे) सहसा या वृद्धीला चालना मिळते. उत्परिवर्तनाचा एका जनुकावर (रक्ताच्या ठराविक कर्करोगांमध्ये दिसत असल्याप्रमाणे) किंवा अनेक जनुकांवर परिणाम होऊ शकतो, जसा मेंदू व मोठ्या आतड्याचा कर्करोगामध्ये दिसून येतो.
कर्करोगाचे निदानासाठी आजही रोगनिदानशास्त्र हेच मूलभूत आहे. बायॉप्सीच्या नमुन्यातून घेतलेल्या घातक पेशी काचपट्टीवर ठेवून ही तपासणी केली जाते. मेंदूच्या स्कॅनमध्ये ज्या रुग्णांचे निदान असामान्य निघते त्यांना बायॉप्सी करवून घ्यावी लागते. सहसा सीटी किंवा एमआरआय स्कॅन किंवा मूलभूत छेदन करून हा नमुना घेतला जातो. नंतर अंतीम निदानासाठी रोगनिदानतज्ज्ञ गाठीचा नमुना तपासतात. ग्लायोमामध्ये, जरी सर्वोच्च दर्जाच्या गाठीनुसार निष्पत्ती ठरवली जात असली तरी, भिन्न दर्जाच्या गाठी एकत्र असू शकतात. सीटी किंवा एमआरआय स्कॅनमध्ये सर्वोच्च दर्जा दाखविणाऱ्या उतीच्या अचूक स्थानाचे भाकीत करणे अशक्य असल्यामुळे, बायॉप्सीतून मिळालेला उतीचा रोगनिदान नमुना गाठीचे प्रतिनिधित्व करत नसण्याचीही शक्यता असते. अननुभवी हातांत आणि काही ठराविक प्रकारच्या गाठींमध्ये, बायॉप्सीतील त्रुटीचा दर ३० टक्के इतका जास्त असू शकतो.
अशा त्रुटी दूर करण्यासाठी द्रव बायॉप्सी हे एक तंत्रज्ञान आहे. मेंदूच्या गाठी, रक्त प्रवाहात आणि मेंदू व मज्जारज्जूच्या द्रव सूक्ष्म व अतीसूक्ष्म पेशींमध्ये मुक्त होऊन (यांना एक्सोसोम्स म्हणतात आणि या जिवंत पेशींद्वारा मुक्त केल्या जातात), गाठीच्या डीएनए (मृत पेशींद्वारा रक्तात मुक्त झालेल्या) आणि गाठीच्या पेशींचे अभिसरण करत राहतात. रक्तातील हे आधार द्रव्य विलग करून त्याचे विश्लेषण केल्यामुळे आपल्याला केवळ निदानाचेच अचूक चित्र मिळत नाही तर कर्करोगास कारणीभूत होणारे मार्ग ओळखण्यास मदतही होते. मुक्त झालेल्या एक्सोसोमचे प्रमाण गाठीच्या दर्जासह घातांकी वाढत असल्यामुळे, उच्च दर्जाचे लहानसे लपलेले विकार स्थल म्हणजे मोठ्या प्रमाणावर कमी दर्जाची गाठ असते जी पारंपरिक बायॉप्सीमध्ये सुटू शकते आणि द्रव स्वरूपात दिसू शकते. २०१५ मध्ये एमआयटीने जरी याला एक महत्त्वाचा शोध म्हणले असले तरी, द्रव बायॉप्सी अजूनही बाळबोध स्वरूपात आहे. तथापि, अपोलो रिसर्च अँड इनोव्हेशन्स, हैद्राबादमध्ये केलेल्या दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, मेंदूच्या गाठीचे निदान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर दाखवला गेला.
रोगनिदानशास्त्राच्या मर्यादांपैकी एक म्हणजे, यातून आपल्याला जरी निदान मिळत असले तरी, कर्करोगास कारणीभूत असलेल्या संभाव्य उत्परिवर्तक मार्गांबाबत पेशींची रचना आपल्याला खूपच कमी माहिती देते. आजाराचा प्रसार रोखणाऱ्या काही विशिष्ट औषधांनी आता यांपैकी काही मार्गांना लक्ष्य केले जाऊ शकते. अलीकडील विकासामध्ये, पूर्णपणे रोगनिदानात्मक दर्जा प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आणि निदानाची अचूकता सुधारणारा, तसेच संभाव्य उपचारांना मार्गदर्शन करणारा एक जीनोमिक घटक निदानामध्ये आणण्याची जबाबदारी जागतिक आरोग्य संघटनेने आता रोगनिदान तज्ज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय गटावर सोपवले आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये, ग्लायोमांच्या निदानासाठी ५-६ जनुकीय गाठ चिन्हक अनिवार्य बनले आहेत. आज, गाठीच्या नमुन्यांमध्ये एकाच वेळी ३०,००० भिन्न जनुकीय उत्परिवर्तकांची चाचणी करणारे तंत्रज्ञान अस्तित्वात आहे. कालांतराने जिनोमिक डेटाचे आणखी मुद्दे समाविष्ट झाल्यावर, अशा रुग्णांचे प्रोग्नोस्टिकेशन आणि उपचार नक्कीच सुधारतील.
उच्च दर्जाच्या गाठींमध्ये, मूलभूत शस्त्रक्रियेनंतर जिवंत राहण्याची शक्यता वाढते. परंतु, अशा शस्त्रक्रियेनंतर जर शरीराच्या विरुद्ध बाजूला अर्धांगवायू निर्माण झाला नाही तरच ती उपयुक्त ठरू शकते. गाठीच्या मूलभूत शस्त्रक्रियेच्या निष्पत्तीमध्ये फरक घडवून आणला आहे अशी दोन तंत्रज्ञाने म्हणजे ‘जागे ठेवून’ दिलेली भूल आणि शस्त्रक्रिया चालू असताना केलेले एमआरआय. असे विकार स्थल काढताना शल्यविशारदकाला येत असलेली मुख्य समस्या म्हणजे गाठीच्या ‘किनारीचे’ अचूक भाकीत करणे, कारण अगदी शस्त्रक्रियेच्या अगदी आधुनिक सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा ही किनार सामान्य मेंदूसारखी दिसते. या किनारीपासून भरकटल्यास अर्धांगवायू होऊ शकतो तर, ही ‘किनार’ न काढल्यास जगण्याची शक्यता कमी होईल. जागे ठेवून भूल देणे हे तुलनेने नवीन तंत्र आहे ज्यामध्ये गाठ उघडी असताना, शस्त्रक्रियेच्या मध्ये रुग्णाला जागे करता येते आणि तरीही त्याला अजिबात वेदना होत नाहीत. त्यांना बोलता येते, हातापायांची हालचाल करता येते आणि शल्यविशारदकाला ते सांगू शकतात की त्यांना त्यांचे हातपाय हालवता येत आहेत का किंवा गाठ काढण्याचे काम चालू असताना त्यांना काही असामान्य वाटते आहे का. पहिली हिंट मिळाली किंवा त्रास जाणवला की लगेच शस्त्रक्रिया थांबवता येते आणि त्यामुळे विकृती ठळकपणे कमी करता येते. शस्त्रक्रिया चालू असताना केलेल्या एमआरआयमुळे सुद्धा गाठीची किनार राहिली असल्यास वास्तव वेळेत ती ओळखण्यास मदत होते. जागे ठेवून भूल देण्यासह याचा वापर केल्यास त्यामुळे मूलभूत शस्त्रक्रियेची निष्पत्ती ठळकपणे सुधारते.
मूलभूत शस्त्रक्रिया किंवा बायॉप्सी (शस्त्रक्रिया करता न येणाऱ्या रुग्णांमध्ये) ही उपचारांची पहिली पायरी असली तरी अशा रुग्णांना किरणोत्सर्गाचे उपचार अनिवार्य असतात. बाहेरील शलाकेद्वारा दिलेल्या किरणोत्सर्गाच्या उच्च मात्रेमुळे सहसा गाठीच्या डीएनएला नुकसान होते आणि त्यामुळे गाठीच्या प्रतिकृती निर्माण होत असताना गाठीच्या पेशी मरतात. किरणोत्सर्गाचे उपचार संपल्यावरही हे दीर्घकाळ चालू राहते. परंतु, किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशींबरोबरच त्याभोवतीच्या सामान्य उतींनाही नुकसान पोहोचते. हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आता नवीन तंत्रे उदयास आली आहेत. स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरीमुळे शेकडो उप-चिकित्सिय क्ष किरण शलाका गाठीतील एकाच बिंदूवर केंद्रित करता येतात. त्यामुळे गाठीला जास्तीत जास्त मात्रा दिली जाते परंतु आसपासच्या उती त्याला कमी उघड होतात आणि लगतच्या सामान्य मेंदूचे किरणोत्सर्गाच्या त्रासदायक प्रभावांपासून संरक्षण होते. पारंपरिक किरणोत्सर्गामध्ये इलेक्ट्रॉन्स वापरले जातात तर, आता ठराविक परिस्थितींमध्ये प्रोटॉन शलाकेच्या वापरामुळे मेंदूच्या गाठीच्या किरणोत्सर्गामध्ये क्रांतीकारी बदल होत आहेत. इलेक्ट्रॉन्सपेक्षा प्रोटॉन्सचे कण मोठे असल्यामुळे त्यांच्यात जास्त उर्जा असते आणि ते गाठीवर जास्त अचूकपणे केंद्रित होऊ शकतात. प्रोटॉनची संपूर्ण उर्जा गाठीवरच पोहोचवली जात असल्यामुळे, गाठीच्या पलीकडे किरणोत्सर्गाचा प्रभाव होत नाही. पारंपरिक किरणोत्सर्गी प्रणालींसह असे अचूक लक्ष्य साधता येत नाही. दक्षिण आशियातील पहिले प्रोटॉन उपचार पद्धती केंद्र नुकतेच चेन्नईला सुरू झाले आहे.
मेंदूच्या गाठीचे व्यवस्थापन करण्यामध्ये किमोथरेपीच्या उपचारांचे घटक वापरणे हा प्रथम उपचार नव्हता,परंतु आगामी वर्षांमध्ये यात बदल होऊ शकतो. ग्लायोमा उपगटांची विशिष्ट उत्परिवर्तनांसह, किमो-संवेदनशीलता, अनेक वर्षांपासून ज्ञात आहे. जर ग्लायोमा विशिष्ट लक्ष्य साधता येणाऱ्या उत्परिवर्तकांना आश्रय देत असल्याचे आढळले तर, केमोथेरपीचे निकाल लक्षणीय ठरू शकतात. आजाराच्या जीवशास्त्राबाबत आपली समज जशी सुधारेल तशी नवीन लक्ष्य शोधली जातील. जगभरात आता २०० हून जास्त चिकित्सिय परीक्षणांमध्ये ग्लायोमा रुग्णांची नेमणूक केली जात आहे. ग्लायोमांतील अनेक कर्करोगास कारणीभूत मार्ग ओळखून अवरोधित करण्याचे यामध्ये प्रयत्न केले जात आहेत. ‘रोगप्रतिकार तपासणी नाके संदमकांच्या’ (‘इम्युन चेकपॉइंट इनहिबिटर्स’) स्वरूपात किमोथेरपीची नवीन रूपे कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी शरीराच्या स्वतःच्या प्रतिकार यंत्रणेचावापर करीत आहेत. अशा पहिल्या औषधांना आता अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. भविष्यात मेंदूच्या गाठीवरी उपचारांमध्ये याची नक्कीच महत्वाची भूमिका असेल.
आपण जागतीक ब्रेन ट्युमर दिवस साजरा करत असताना, हा आजार बरा करण्याच्या दिशेने आपण पूर्वीपेक्षा खूपच पुढे गेलो आहोत याबाबत आपण जास्त सकारात्मक असले पाहिजे. ३० वर्षांपूर्वी रुग्णाचे जिवंत राहणे ३-४ महिने असायचे ते आता शल्यक्रियात्मक आणि किरणोत्सर्ग तंत्रांतील सुधारणांमुळे १४ महिन्यांपर्यंत वाढले आहे. परंतु आजही, इतर कर्करोगाच्या उपचारांमध्ये इतकी प्रगती झालेली असूनही, केवळ १ टक्का कर्करोग असलेले ग्लायोमा, कर्करोगाशी निगडीत मृत्यूंमध्ये ३% योगदान देतात. या भयंकर आजाराचे जीवशास्त्र समजावून घेण्यासाठी आपण बरीच पुढे वाटचाल केली आहे आणि उपचारांना प्रतिसाद देणारे उपगट वेगळे काढणे हा या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असेल. आम्हाला आशा आहे की या अंतिम सीमांवर विजय मिळवणे आता दूर नाही.