HomeVernacular BlogsMarathiChemotherapy - You should know this

Chemotherapy – You should know this

किमोथेरपी – हे तुम्हाला माहीत असावे

सहसा कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरली जाणारी केमोथेरपी, कर्करोगाच्या पेशींची होणारी अनेकपट वाढ रोखण्यासाठी असलेले औषध दर्शवते. असामान्यरित्या अनेक पट वाढत जाण्याची क्षमता असलेल्या लक्ष्यित पेशींचा नाश करून हे साध्य केले जाते. ही उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी विविध प्रकारची औषधे वापरली जातात. कर्करोगाच्या ज्या स्थितीवर उपचार केले जात आहे त्यावरही किमोथेरपीचा प्रभावीपणा अवलंबून असतो.

किमोथेरपीचे दुष्परिणाम असले तरी, त्याचे फायदे हे दुष्परिणामांच्या जोखमीहून जास्त आहेत.

किमोथेरपी म्हणजे काय?

किमोथेरपी म्हणजे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी औषधांचा वापर; यांना कधीकधी सायटोटॉक्सिक औषधे असेही म्हणतात.

किमोथेरपीचे विविध उपचार आहेत, यामध्ये केवळ एक औषध (कधीकधी) किंवा अनेक भिन्न औषधे असतात जी काही दिवस किंवा आठवडे दिली जाऊ शकतात. हे उपचार सहसा किमोथेरपीच्या अनेक क्रमाचे असू शकतात आणि कोणत्या कर्करोगावर उपचार केले जात आहेत त्यानुसार रुग्णाला पथ्य सांगितले जाते.

किमोथेरपी कशी देतात?

कर्करोगाचा प्रकार आणि दिले जाणारे उपचार यानुसार भिन्न मार्गांनी किमोथेरपी दिली जाऊ शकते.

बहुतेकदा शीरेत इंजेक्शन देऊन हे दिले जाते (इंट्राव्हेनस). तोंडावाटे (मौखिक), स्नायूंमध्ये इंजेक्शनद्वारा (इंट्रामस्क्युलरली) किंवा त्वचेखाली (सबक्युटेनसली) सुद्धा हे दिले जाऊ शकते.
काही प्रकरणांमध्ये, किमोथेरपी मज्जारज्जूच्या भोवतील द्रवामध्येही टोचली जाऊ शकते (इंट्राथेकली). औषधे कोणत्याही मार्गांनी दिली तरी ती रक्तप्रवाहात शोषली जातात आणि संपूर्ण शरीरात वाहून नेली जातात ज्यायोगे ती कर्करोगाच्या पेशींपर्यंत पोहोचू शकतील.

इंट्राव्हेनस किमोथेरपी

इंट्राव्हेनस (IV) किमोथेरपी कधीकधी तुमच्या हाताच्या शिरेमध्ये ‘ड्रिप’ लावून दिली जाऊ शकते. यामध्ये, डॉक्टर किंवा परिचारिका तुमच्या शिरेमध्ये एक बारीक नळी (कॅन्युला) सरकवतात. घरी जाण्यापूर्वी ही काढली जाते.

जर शिरा सापडत नसतील तर, रुग्णाला परिधीयपणे सरकवलेला मध्यवर्ती शिरेतील कॅथीटर (पेरिफेरली इनसर्टेड सेंट्रल व्हेनस कॅथेटर – PICC) बसवावा लागू शकतो. ही एक अतीशय बारीक नळी असते जी तुमच्या हाताला जिथे बाक असतो तेथील शिरेमध्ये बसवली जाते. एकदा बसवल्यावर ती सुरक्षित केली जाते आणि अनेक आठवडे त्या शिरेमध्ये राहू शकते.

दुसरा पर्याय म्हणजे, काही रुग्णांना मध्यवर्ती मार्गातून केमोथेरपी घेणे आवश्यक असू शकते. या मार्गाला ‘बोगदा केला जातो’ म्हणजे ती त्वचेखालून जाऊ शकते आणि तुमच्या ह्रदयाकडे जाणाऱ्या मोठ्या शिरांपैकी एकीपर्यंत पोहोचू शकते. मध्यवर्ती मार्ग बसविण्याच्या काही लोकप्रिय जागा म्हणजे गळ्याच्या अंतर्गत शिरेमध्ये (जगलर व्हेन) बसविण्यासाठी जत्रुक मार्गाने (सब-क्लॅव्हिक्युलर) किंवा ‘मानेच्या प्रदेशातून’ ‘छातीचा प्रदेशात’ पोहोचणे.

रुग्णाला सौम्य गुंगीचे औषध देऊन किंवा स्थानिक भूल देऊन मध्यवर्ती मार्ग बसवला जातो आणि संपूर्ण उपचारांदरम्यान अनेक आठवडे तो तिथे राहू शकतो.

तोंडी किमोथेरपी

किमोथेरपीच्या गोळ्याही दिल्या जाऊ शकतात ज्या घरी घेता येतात. प्रिस्क्रिप्शननुसार औषधोपचार कधी व कसे घ्यायचे याबाबत उपचारकर्ता डॉक्टर किंवा परिचारिका याबाबत मार्गदर्शन करेल.

उपचार योजना

उपचार केला जाणारा कर्करोग, मिळणारी औषधे आणि कर्करोगाला रुग्ण कसा प्रतिसाद देतो यानुसार रुग्णाचे उपचार आणि त्याचा कालावधी ठरतो.

उपचार करणारे फिजिशिअन आणि परिचारिकेने उपचारांचे फायदे आणि संभाव्य दुष्परिणामांबाबत स्पष्ट करून सांगितले पाहिजे. उपचार सुरू करण्यापूर्वी, केमोथेरपी घेण्याचे फायदे तोटे रुग्णाला माहीत आहेत आणि तो/ती माहितीपूर्ण निर्णय घेत आहे याची डॉक्टर व परिचारिकेने खात्री करावी. उपचारांसाठी रुग्णाला संमती देण्यासही सांगितले जाईल आणि यामध्ये माहितीपूर्ण संमती घेण्याचा समावेश होतो.

किमोथेरपी कोठे दिली जाते?

दिवसाच्या उपचार केंद्रामध्ये बाह्यरुग्ण म्हणून किंवा हिमॅटॉलॉजी वॉर्डमध्ये आंतररुग्ण म्हणून किमोथेरपी दिली जाऊ शकते. रुग्णाला कोणत्या प्रकारची किमोथेरपी दिली जात आहे त्यानुसार त्याला रुग्णालयात राहावे लागले का हे ठरते.

जर दिवसाच्या उपचार केंद्रामध्ये रुग्णाला केमोथेरपी दिली जात असेल तर, उपचार सुरू होण्यापूर्वी रुग्णाला काही ठराविक चाचण्या करून घ्याव्या लागतात आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. कर्करोगाचा त्रास होत असलेल्या प्रत्येक रुग्णाकडे विशेष लक्ष द्यावे लागत असल्यामुळे, रुग्ण तसेच त्यासह आलेल्या व्यक्तीने बाह्यरुग्ण तासांमध्ये जास्त विलंब लागेल याची तयारी ठेवावी.

किमोथेरपीचा एक प्रमुख दुष्परिणाम म्हणजे तिचा कर्करोगाच्या पेशींवर तसेच सुदृढ पेशींवरही परिणाम होतो. त्यामुळे ब्लड काउंट्सची वरचेवर बदलत असतात. उपचारांच्या शेवटच्या क्रमानंतर जर रुग्णाचे ब्लड काउंट पूर्णपणे पूर्ववत झाले नाहीत तर पुढील उपचार लांबवावे लागू शकतात. रुग्णाला बरे वाटत नसेल तरीही याला विलंब करावा लागू शकतो. रुग्ण केमोथेरपीला कसा प्रतिसाद देतो ते उपचार करणारे डॉक्टर नियमितपणे तपासतील. रक्ताच्या चाचण्या, क्ष-किरण तपासण्या व स्कॅनचे निकाल उपचारांना कर्करोगाचा प्रतिसाद दर्शवतात.

कधीकधी, तुमची उपचार योजना बदलावी लागू शकते. डॉक्टरांना आशा होती तितका कर्करोगाने वेगाने प्रतिसाद न दिल्यामुळे हे होऊ शकते. किमोथेरपीची औषधे बदलल्यामुळे जास्त चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

किमोथेरपी कसे काम करते?

कर्करोगाच्या पेशी असामान्य, वेगाने वाढणाऱ्या आणि विभाजीत होणाऱ्या असतात. कोणत्याही वेगाने विभाजीत होणाऱ्या पेशींना केमोथेरपीची औषधे मारतात.

दुर्दैवाने, कर्करोगाच्या पेशी आणि केसांची मुळे, त्वचा, अस्थी मज्जा आणि आपल्या तोंडाचे आतील अस्तर यांसारख्या इतर वेगाने विभाजीत होणाऱ्या आपल्या शरीराच्या पेशी यांतील फरक औषधांना समजत नाही. त्यामुळेच केमोथेरपीशी निगडीत दुष्परिणाम घडतात.

किमोथेरपीचे दुष्परिणाम

किमोथेरपी मिळणाऱ्या सर्वांनाच दुष्परिणाम अनुभवास येतील असे नाही, परंतु लक्षात ठेवावे की बहुतांश दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरुपाचे असतात आणि उपचार थांबवल्यावर हळूहळू निघून जातील.

किमोथेरपीचे अनेक भिन्न प्रकार असतात, त्यांपैकी काहींचे विशिष्ट दुष्परिणाम असतात. सर्वात सामान्य दुष्परिणाम आहेत:

  • केस गळणे
  • तोंड येणे
  • त्वचेतील बदल
  • चव बदलणे
  • मळमळणे आणि उलट्या होणे
  • आतड्याच्या सवयींमध्ये बदल
  • थकवा
  • संसर्ग
  • रक्तस्राव आणि खरचटणे
  • वंध्यत्व आणि कामवासना कमी होणे.

दृष्टीकोन

उपचारांची प्रगती मोजण्यासाठी केमोथेरपी दरम्यान व नंतर रुग्णाला रक्ताच्या चाचण्या तसेच इतर तपासण्या करून घ्याव्या लागतात. उपचार पूर्ण झाल्यावर सहसा किमोथेरपीचे दुष्परिणाम निघून जातात. कर्करोगावर जितके लवकर उपचार केले जातील तितका केमोथेरपीचा कालावधी कमी होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे संबंधित दुष्परिणाम कमी असतात. काही रुग्ण केमोथेरपी चालू असतानाही आपला दिनक्रम चालू ठेवू शकतात तर काहींना त्यांच्या दिनक्रमामध्ये काही बदल करावे लागू शकतात.

Quick Appointment

Most Popular