CT Coronary Angiogram

0
3978

सीटी कॉरोनरी अँजिओग्राम – विहंगावलोकन

कॉम्प्युटेड टोमोग्राफीमध्ये (सामान्यपणे सीटी स्कॅन असा संदर्भ दिला जातो) आपल्या शरीराच्या स्पष्ट प्रतिमा निर्माण करण्यासाठी संगणकाच्या मदतीने क्ष-किरण प्रतिमांचे मिश्रण वापरले जाते. फुफ्फुसे, मेंदू, मूत्रपिंडे, ह्रदय किंवा तुमचे शरिराच्या कोणत्याही भागाच्या रक्तवाहिन्यांमध्ये असामान्यतेची लक्षणे आढळल्यास तुमचे डॉक्टर तुम्हाला ही चाचणी करण्याचा सल्ला देऊ शकतात.

सीटी कोरोनरी अँजिओग्राम ही एक नैदानिक प्रतिमा चाचणी आहे ज्यामध्ये तुमच्या ह्रदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आणि ह्रदयाच्या ३डी प्रतिमा निर्माण केल्या जातात. तुमच्या वैद्यकीय स्थितीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आणि तुमचे योग्य उपचार ठरविण्यासाठी तुमचे डॉक्टर या चाचणीतून मिळणारी माहिती वापरू शकतात.

कोणत्या प्रकारची सीटी अँजिओग्राफी आवश्यक आहे ते ठरवणे

ह्रदयाच्या रोहिणीचा आजार शोधण्यासाठी स्ट्रेस टेस्टिंग हा पारंपरिक अनाक्रमक दृष्टिकोन आहे, परंतु कधीकधी ही चाचणी अनिर्णायक ठरू शकते आणि हृदयाच्या रोहिणीचा आजार असल्याचा तीव्र चिकित्सिय संशय असू शकतो. अशा परिस्थितीमध्ये हृदयाच्या रोहिणीचे योग्य मूल्यांकन करणे आवश्यक असते आणि हे कॅथेटर (बारीक प्लास्टिकची नळी) वापरून केलेल्या हृदयाच्या रोहिणीच्या अँजिओग्राफीतून करता येते किंवा अनाक्रमक सीटी कॉरोनरी अँजिओग्राम काढता येतो. कॅथेटर (बारीक प्लास्टिकची नळी) वापरून केलेल्या कॉरोनरी अँजिओग्राममध्ये बाहू किंवा जांघेतून तुमच्या ह्रदयापर्यंत एक नळी सोडली जाते. ज्या रुग्णांना आधीच हृदयाच्या रोहिणीचा आजार आहे, त्यांच्यासाठी डॉक्टर पारंपरिक कॉरोनरी अँजिओग्राम वापरू शकतात कारण त्यामुळे रुग्णाला प्रक्रियेदरम्यान उपचारही घेता येतात.

मला याची काय गरज आहे?

सीटी कॉरोनरी अँजिओग्राममुळे खराब झालेल्या हृदयाच्या रोहिण्या आणि हृदयाच्या रोहिण्यांतील किटण/प्लाक (मेद/कॅल्शियम जमा होणे) ओळखता येते. सीटी अँजिओग्राफीमुळे डॉक्टरांना तुमच्या रक्तवाहिन्यांच्या जास्त अचूक प्रतिमा मिळतात. यामध्ये जर काही ह्रदयाची समस्या दिसली तर, त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना उपचार योजना सुचवता येते. खालील कारणांसाठी डॉक्टर सीटी अँजिओग्राफीची शिफारस करतात:

  • रोहिण्यांच्या भिंतींवर जमा झालेल्या किटण/प्लाकमुळे (मेद) बंद झालेल्या रक्तवाहिन्या शोधण्यासाठी.
  • मेंदूत तयार झालेल्या असामान्य रक्त वाहिन्या शोधण्यासाठी
  • फुटायच्या स्थितीपर्यंत फुगलेली रक्तवाहिनी शोधण्यासाठी (अॅन्यूरिझम)
  • पायातील शिरांमध्ये निर्माण होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेल्या रक्ताच्या गुठळ्या शोधण्यासाठी
  • इजा होऊन खराब झालेल्या रक्तवाहिन्या शोधण्यासाठी

सीटी अँजिओग्राममधून मिळालेल्या माहितीमुळे ह्रदयविकाराचा झटका किंवा पक्षाघातास प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते.

काही जोखमी समाविष्ट आहेत का?

ही चाचणी बहुतेकदा आक्रमक स्वरपाची असते आणि या नैदानिक चाचणीमध्ये तुम्ही थोड्याशा किरणोत्सर्गालाही उघड व्हाल त्यामुळे यामध्ये थोडीशी जोखीम असते. गर्भवती महिलांना सीटी अँजिओग्राम करण्यास काटेकोरपणे प्रतिबंधित केले जाते कारण त्यामुळे पोटातील बाळाला इजा होऊ शकते. याशिवाय, या प्रक्रियेत वापरलेल्या आयोडिनयुक्त वैधर्म्य माध्यमाला (रेडिओग्राफिक डाय किंवा ज्याला सहसा ‘डाय’ म्हणतात) अॅलर्जीची प्रतिक्रिया येण्याचीही शक्यता असते. तुम्हाला अॅलर्जीच्या प्रतिक्रिया येतील असे वाटत असल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोला.

हे कसे केले जाते?

तुम्हाला शिरेतून एक आयोडिनयुक्त वैधर्म्य (डाय) टोचले जाईल आणि हे वैधर्म्य ह्रदयाच्या रोहिण्यांतून पुढे जात असताना त्यांच्या प्रतिमा घेतल्या जातील. प्रक्रियेपूर्वी तुमचा ह्रदयाचा दर कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषधे (बीटा ब्लॉकर्स) विहित करू शकतात, कारण ह्रदयाचा दर जास्त असल्यास तुमच्या हृदयाच्या रोहिण्यांच्या प्रतिमा अस्पष्ट येतात. जर वैधर्म्य साहित्याला अॅलर्जी असेल तर, प्रतिक्रियेची जोखीम कमी करण्यासाठी औषधोपचार दिले जाऊ शकतात.

तुमच्या ह्रदयाचा दर नोंदविण्यासाठी तुमच्या छातीवर इलेक्ट्रोड्स बसवले जातात. चाचणीमध्ये काही सेकंद श्वास रोखावा लागू शकतो. संपूर्ण प्रक्रियेला एक तासापर्यंत वेळ लागतो, परंतु प्रत्यक्ष स्कॅनिंगला केवळ पाच सेकंद लागतात. परीक्षा कक्षापासून काचेच्या खिडकीने वेगळ्या केलेल्या एका खोलीतून तंत्रज्ञ यंत्र हाताळत असेल. तंत्रज्ञासह संवाद साधता येण्यासाठी इंटरकॉम सिस्टिम असेल.

चाचणीपूर्वी खाता/पिता येते का?

सहसा तुम्हाला उपाशी पोटी येण्यास सांगीतले जाईल (प्रक्रियेपूर्वी निदान चार तास). चाचणीपूर्वी निदान १२ तास कॅफेनयुक्त पेये टाळावी कारण त्यामुळे तुमच्या ह्रदयाचा दर वाढू शकतो आणि ह्रदयाच्या स्पष्ट प्रतिमा घेणे अवघड बनू शकते. परंतु तुम्ही पाणी पिऊ शकता. रेडिओग्राफिक डायची तुम्हाला अॅलर्जी आहे असे आढळले तर, प्रतिक्रियेची जोखिम कमी करण्यासाठी तुमचे डॉक्टर चाचणीपूर्वी १२ तास औषधोपचार देतील.

विहित औषधे घेतली जाऊ शकतात का?

तुमच्या चाचणीपूर्वी तुम्ही तुमची विहित औषधे घेऊ शकता.

मधुमेहींचे काय?

मधुमेही रुग्णांनी स्कॅनच्या वेळेच्या तीन तास आधी हलका नाष्टा किंवा जेवण घ्यावे. तुमच्या सीटी स्कॅननंतर, तुमच्या मधुमेहाच्या औषधोपचारांनुसार, तुम्हाला तपशीलवार सूचना दिल्या जातील.

सीटी अँजिओग्रामनंतर काय होते?

प्रक्रियेनंतर, एकदा का सीटी अँजिओग्राम पूर्ण झाला की, तुम्ही सामान्य दैनंदिन गोष्टी करू शकता. शरीरातून डाय धुतला जावा यासाठी भरपूर पाणी प्यायला सांगितले जाते.

निष्कर्ष

चाचणीच्या निकालांबाबत तुमचे डॉक्टर चर्चा करतील. निकाल काहीही असले तरी, तुमच्या ह्रदयाचे संरक्षण करण्यासाठी जीवनशैलीतील बदल करणे महत्त्वाचे आहे. धूम्रपान बंद करावे, नियमित व्यायाम करावा, ह्रदयास पोषक आहार घ्यावा आणि मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, शरीराचे वजन, ताण यांसारखे जोखीम घटक व्यवस्थापित करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळोवेळी ह्रदयाची तपासणी करून घ्यावी. तुमच्या जवळच्या आरोग्यसेवा प्रदाताकडून एक सर्वसमावेशक ह्रदयाचे स्क्रीनिंग किंवा सुदृढ ह्रदय पॅकेज घेण्याची मदत होऊ शकते.