HomeHealth A-ZCardiologyFoods Bad For Heart

Foods Bad For Heart

तुमच्या ह्रदयासाठी कोणते पदार्थ वाईट आहेत?

जगभरात ह्रदय विकार हे मृत्यूचे एक मुख्य कारण आहे. अगदी मोजक्या लोकांना जन्मजात ह्रदय विकार असतो, परंतु बहुसंख्य रुग्णांना वाईट जीवनशैली आणि आहाराच्या अनियमीत सवयींमुळे हा विकार जडतो. तुमच्या ह्रदयासाठी पौष्टिक नसलेल्या पदार्थांचे अनियंत्रित सेव केल्यामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळ्या व रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येतो.

तुम्ही सेवन करत असलेल्या उष्मांकांचे तुम्ही ज्वलन केले नाहीत आणि भरपूर साखर आणि संपृक्त स्निग्धांश असलेले पदार्थ खात राहिलात तर अल्पावधीतच तुम्ही तुमचे आरोग्य बिघडविण्याची शक्यता आहे. हे पदार्थ पचायला तर अवघड असतातच परंत त्याचबरोबर त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळ्या आणि विषारी घटकही वाढतात. त्यामुळे तुम्ही जर निरोगी जीवनशैलीचा अंगिकार करायचे योजत असाल तर तुमच्या ह्रदयाला संभाव्य नुकसान करणाऱ्या पदार्थांपासून दूर राहा.

तुमचे ह्रदय निरोगी राखण्यासाठी तुम्ही ज्या पदार्थांपासून दूर राहावे त्यांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे –

मीठ

ह्रदय रोगामध्ये उच्च रक्तदाबाचे मोठे योगदान आहे. खूप जास्त मिठाचे सेवन केल्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो आणि ह्रदय विकार होण्याची जोखीमही वाढते.

रिफाईन्ड कर्बोदके – पांढरा तांदूळ, पाव आणि पिझ्झा

पांढरा पाव (ब्रेड), पांढरा भात आणि पिझ्झा यांसारख्या पदार्थांत भरपूर कर्बोदके असतात आणि त्यांचा GI (ग्लायसेमिक इंडेक्स) जास्त असतो, त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळ्यांमध्ये चढ उतार होतात. खूप जास्त GI युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे एकंदरच ह्रदय रोगाची जोखीम वाढते.

सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट एरेटेड पेयांमुळे तुमच्या ह्रदयाला नुकसान पोहोचू शकते कारण यामध्ये भरपूर साखर असते. साखरेचे खूप जास्त सेवन केल्यामुळे लठ्ठपणा, रक्तातील साखरेच्या पातळ्या वाढणे आणि हृदयरक्तवाहिन्यांचे विकार होतात.

लाल मांस

लाल मांसामध्ये कार्निटाइन नावाचे संयुग असते ज्यामुळे रोहिण्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. लाल मांसामध्ये भरपूर संपृक्त स्निग्धांशही असतात ज्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याची जोखीम वाढते.

प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये नायट्रेट नावाचे पदार्थ संरक्षक असते जे तुमच्या शरीराच्या साखर निर्मितीच्या नैसर्गिक क्षमतेमध्ये हस्तक्षेप करते. यामुळे उच्च रक्तदाबाची जोखीम आणि लठ्ठपणा वाढू शकतो आणि परिणामी ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो.

तळलेली कोंबडी

तळलेल्या कोंबडीमध्ये भरपूर उष्मांक, सोडियम आणि स्निग्धांश असतात. खूप जास्त सेवनामुळे उच्च रक्तदाब, प्रकार २चा मधुमेह आणि लठ्ठपणा वाढतो व परिणामी ह्रदय बंद पडते. तळलेल्या कोंबडीऐवजी त्वचा काढून गव्हाच्या पिठात घोळवून बेक केलेली कोंबडीची जास्त चांगली.

बटर (प्रक्रिया केलेले लोणी)

बटरमध्ये मोठ्या प्रमाणात संपृक्त स्निग्धांश असतात ज्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल वाढते आणि तुम्ही ह्रदयरोगाला जास्त प्रवण होता. बटरच्या ऐवजी वनस्पती तेल किंवा ऑलिव्ह तेल वापरलेले स्प्रेड वापरा ज्यामध्ये ह्रदयास पूरक मोनो आणि पॉली असंपृक्त स्निग्धांश असतात.

मार्गारिन

मार्गारिन हा लोण्यासारखा पदार्थ असतो जो वनस्पती तेल आणि कधीकधी प्राण्यांच्या स्निग्धांशांपासून तयार केला जातो, यामध्ये असलेल्या ट्रान्स फॅट्स प्रकार २चा मधुमेह तसेच हृदयाच्या रोहिणीचा आजार होण्याची जोखीम वाढवू शकतात.

तळलेले पदार्थ

तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स, कर्बोदके आणि भरपूर सोडियम असते ज्याचा रोहिण्यांमध्ये अडथळा निर्माण करण्याशी थेट संबंध आहे.

आईस्क्रीम

आईस्क्रीममध्ये भरपूर स्निग्धांश, संपृक्त स्निग्धांश आणि साखर असते. भरपूर साखर आणि स्निग्धांश असलेले आईस्क्रीम खाल्याने वजन वाढते. त्यामुळे तुमच्या ट्रायग्लिसेराईड्सच्या पातळ्या वाढून ह्रदयविकाराचा झटका येतो. गोठवलेले फळांचे बार, सॉरबेट किंवा कमी स्निग्धांश असलेले गोठवलेले दही यांसारख्या गोष्टी निवडून उष्मांक व स्निग्धांश कमी करा.

बेक केलेले (भाजलेले) पदार्थ

केक, कुकीज आणि मफिन्समध्ये सहसा भरपूर साखर असते ज्यामुळे वजन वाढते. त्यामध्ये ट्रायग्लिसेराईड्सही असतात ज्यामुळे ह्रदय रोग होतो. बेक केलेल्या (भाजलेले) पदार्थांतील मुख्य घटक असतो मैदा, जो तुमची रक्तातील साखर वाढवतो आणि तुम्हाला जास्त भूक लागते.

खोक्यांतील सिरियल

खोक्यांतील सिरियलमुळे तुमच्या रक्तातील साखर वाढून कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराईड्स वाढतात. अतिरिक्त साखर कमी असलेले सिरियल्स निवडा.

इन्स्टंट नूडल्स

ही कुरकुरीत नूडल्सची पाकिटे आता कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक अन्न बनली आहेत. नूडल्स तळलेल्या असतात, जे तुमच्या ह्रदयासाठी चांगले नाही. त्यांत मिठाचे प्रमाणही खूप जास्त असते. खूप जास्त मीठ खाल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि याचा तुमच्या ह्रदयावर वाईट परिणाम होऊ शकतो.

मद्य

खूप जास्त मद्यपान केल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि ह्रदय रोगाची जोखीमही वाढते. मद्यामुळे वेंट्रिक्युलर टॅचीकार्डिया नावाचा ह्रदयाचा अनियमीत ताल निर्माण होऊ शकतो जो कधीकधी जीवघेणा ठरू शकतो.

Avatar
Verified by Apollo Doctorshttps://www.askapollo.com/
8000+ Top doctors Associated and Apollo Hospitals is continuosly ranked as No1 Multispecialty Hospitals in India with best in class treatments for Cancer, Knee replacements, Liver Transplant, Heart, Diabetes, Kidney.
Quick Appointment
Most Popular

Breast Cancer: Early Detection Saves Lives

Do Non-smokers Get Lung Cancer?

Don’t Underestimate the Risk: The Truth About Sudden Cardiac Arrest in Young People

Life after One Year Coronary Artery Bypass Graft (CABG) Surgery: A Journey of Recovery and Renewed Health.

Book ProHealth Book Appointment
Request A Call Back X
52.172.5.58 - 1