HomeHealth A-ZCardiologyHEART ATTACK IN CHILDREN - Dr Neville Solomon

HEART ATTACK IN CHILDREN – Dr Neville Solomon

लहान मुलांमधील हृदयविकाराचा झटका

आढावा

हृदयविकाराचे झटके हा भारतातील एक वाढता विषय आहे कारण आपण भारतीय हे अनुवंशिकतेने हृदय रोहिण्यांच्या आजारास प्रवण असतो. हृदयाच्या कोणत्याही समस्येस “हृदयविकाराचा झटका” असे लेबल लावायची सामुदायिक मानसिकता आहे. मुलांना होणारा हृदयरोग हा प्रौढांच्या हृदयरोगापेक्षा वेगळा असतो आणि यापैकी अनेक स्थिती कायमस्वरुपी बर्‍या होऊ शकतात.

हृदयात प्रामुख्याने ४ कप्पे आणि २ प्रमुख धमन्या असतात ज्या ह्रदयाच्या उजव्या बाजूला रक्त पुरवतात आणि डाव्या बाजूला ४ जवनिकांमधील धमन्या रक्त परत फिरवत असतात. ४ झडपा असतात. निलय (प्रमुख नळी) प्रत्येक प्रमुख कक्षात असते (निलय). बाळाला जन्मजात एक किंवा अनेक हृदयरोग असू शकतात – धमन्यांना आणि झडपांना व्यत्यय आणणारी अथवा न आणणारी भोके, गळणार्‍या झडपा, पिळलेल्या धमन्या आणि मार्ग चुकलेल्या आणि कमी विकसित झालेल्या रक्तवाहिन्या! बाल हृदयरोग शल्यचिकित्सक अशा असंख्य प्रकारच्या सादरीकरणांना सामोरे जातात आणि मात करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करीत असतात.

गेल्या दशकात मुलांच्या ह्रदयाच्या शल्यक्रियांच्या प्रमाणात तसेच लक्षात येण्यासारख्या गुंतागुंतीत प्रचंड वाढ झाली आहे. शल्यचिकित्सक, हृदयरोगतज्ञ, भूलतज्ञ, इन्टेसिव्हिस्ट्स, छिद्रतज्ञ, परिचारिका आणि रुग्णसेवा करणारा स्टाफ यांच्या सामूहिक बहू-वाहिन्यांच्या दृष्टिकोनामुळे उत्कृष्ट निकाल मिळत आहेत.

लहान मुलांमधील हृदयविकाराच्या झटक्याची कारणे

लहान मुलांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो! एएलसीएपीए नावाची स्थिती असते (फुफ्फुसीय धमनी पासून डाव्या बाजूच्या हृदयाच्या धमनीचे विसंगत मूळ). संपूर्ण शरीरात रक्त पुरवठा करणारी जवनिका ही मुख्य वाहिनी असते. उजव्या आणि डाव्या हृदयास रक्त पुरवणार्‍या दोन प्रमुख रक्तवाहिन्या असतात. जेव्हा जवनिकेऐवजी, डावी रोहिणी फुफ्फुसातील रोहिणीतून उद्भवलेली असते तेव्हा (दुसरी रक्तवाहिनी अशुद्ध, प्राणवायू- कमी असलेले रक्त वाहते), बाळ 2-3 महिन्यांचे असताना, फुफ्फुसातील रक्तवाहिनीतील दाब कमी होतो आणि रक्ताचा प्रवाह दिशा बदलून डावीकडील रक्तवाहिनीत जातो. यामुळे रक्त वाहणारे महत्त्वाचे पौष्टिक घटक हृदयाला कमी पडतात. अवरोधित वाहिनीमुळे एखाद्या प्रौढाला हृदयविकाराचा झटका येताना होते तसेच, बाळाला हृदयविकाराची भयानक वेदना होते आणि ते अतिदु:खाने किंचाळते.

हृदयविकाराचा झटका आलेल्या लहान मुलांवर उपचार करण्यातील आव्हाने

अत्यंत वाईट स्थितीत ह्रदय असलेल्या अनेक बाळांना अशा प्रकारे आमच्याकडे आणले गेले, त्यांची एकंदरीत स्थिती खराब होती. त्यांच्या स्थिती एकाहून जास्त प्रकारे खराब असतात. पहिले म्हणजे शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असते कारण हृदय आधीच खराब झालेले होते आणि शस्त्रक्रियेनंतर अतीदक्षता विभागात या बाळांची खूपच काटेकोरपणे काळजी घेणे आवश्यक असते. काहीना ईसीएमो या कृत्रिम जीवन-आधार प्रणालीची गरज पडू शकते. बाळाचे इतर अवयव जसे फुफ्फुसे, मुत्रपिंडे आणि यकृत देखील नीट काम करत नाहीत. जेव्हा हृदय कमकुवत होते तेव्हा सर्वच अवयवाना त्रास होतो. बाळाची प्रतिकारशक्ती देखील प्रभावित होते आणि तो/ती जिवाला धोका निर्माण करणाऱ्या संक्रमणांस प्रवण होतात.
सुदैवाने अपोलो रुग्णालयांत, आम्ही अशा अनेक बाळांना वाचविण्यात यशस्वी ठरलो आहोत. फक्त दोन बाळांना आणायला उशीर झाला आणि त्यांचे हृदय व इतर अवयव कार्यक्षमतेपलीकडे खराब झाले.

अचूक निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया – काळाची गरज

विस्तृत कार्डिओमायोपथी नावाच्या शस्त्रक्रिया करता न येणाऱ्या स्थितीचे चुकीचे निदान झालेल्या बाळांमधील या भयंकर, परंतु बरे करता येणाऱ्या स्थितीचे आम्ही निदान केले आहे. जेव्हा तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती तेव्हा बाळांना वैद्यकीयरित्या व्यवस्थापित केले गेले. कावासाकी आजार नावाचीही एक स्थिती असते ज्यामध्ये मुलांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी प्रौढांप्रमाणे त्यांच्या हृदय रोहिण्यांना दुसर्‍या मार्गाने जोडणे आवश्यक ठरते.

निष्कर्ष

म्हणूनच, थोडक्यात सांगायचे तर, मुलांना देखील हृदयविकाराचे झटके येऊ शकतात आणि प्रथमत: जवळच्या ह्रदय केंद्रात अचूक निदान करून त्यांची प्रकृती स्थिर करावी लागते आणि नंतर त्यांच्यावर जीव वाचवणारी शस्त्रक्रिया करावी लागते.

डॉ. नेविल सोलोमन एमएस, एमसीएच
वरिष्ठ सल्लागार – बालरोग आणि प्रौढ जन्मजात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे शल्यविशारद
अपोलो लहान मुलांची रुग्णालये, चेन्नई

Avatar
Verified by Apollo Doctorshttps://www.askapollo.com/
8000+ Top doctors Associated and Apollo Hospitals is continuosly ranked as No1 Multispecialty Hospitals in India with best in class treatments for Cancer, Knee replacements, Liver Transplant, Heart, Diabetes, Kidney.
Quick Appointment
Most Popular

Breast Cancer: Early Detection Saves Lives

Do Non-smokers Get Lung Cancer?

Don’t Underestimate the Risk: The Truth About Sudden Cardiac Arrest in Young People

Life after One Year Coronary Artery Bypass Graft (CABG) Surgery: A Journey of Recovery and Renewed Health.

Book ProHealth Book Appointment
Request A Call Back X
52.172.5.58 - 1