Brain Tumor

मेंदूच्या गाठींवर उपचार करणे

मेंदूचा कर्करोग किंवा गाठी म्हणजे मेंदूतील पेशींची असामान्य वाढ. घातकी गाठी वाढून शरीराच्या दूरच्या इतरही भागांमध्ये आक्रमकपणे पसरू शकतात. ज्या गाठी पसरत नाहीत किंवा आसपासच्या उतींवर हल्ला करत नाही त्यांना सौम्य गाठी म्हणतात. घातकी गाठींच्या तुलनेत सौम्य गाठी कमी धोकादायक असतात, परंतु सौम्य गाठीमुळे आसपासच्या उती दाबल्या जाऊन मेंदूमध्ये समस्या उद्भवू शकते.

मेंदूच्या पेशींमध्ये उगम पावणाऱ्या मेंदूच्या गाठींना मेंदूच्या प्राथमिक गाठी म्हणतात. सर्वात सामान्य मेंदूच्या प्राथमिक गाठी म्हणजे ग्लायोमा, मेनिन्जिओमा, पिच्युटरी अॅडिनोमा, व्हेस्टिब्युलर श्वानोमाज आणि न्यूरोएक्टोडर्मल गाठी (मेड्युलोब्लास्टोमा) या आहेत. ग्लायोमा या संज्ञेमध्ये ग्लिओब्लास्टोमा, अॅस्ट्रोसायटोमा, ऑलिगोडेन्ड्रोग्लायोमा आणि एपेंडिमोमा यांचा समावेश होतो.

मेंदूच्या मेटास्टॅटिक किंवा दुय्यम गाठी इतर गाठींपासून मेंदूमध्ये पसरतात.

मेंदूच्या गाठीची लक्षणे ही सहसा तिच्या आकारमानापेक्षा ती कोठे आहे त्यानुसार असतात. जेव्हा एखादी गाठ मेंदूच्या सामान्य उती नष्ट करते किंवा त्यांच्यावर दाब आणते तेव्हा लक्षणे दिसू लागतात. गाठीभोवतीच्या उतींना सूज येते किंवा ती गाठ मेंदू व मज्जारज्जू भोवतीच्या द्रवपदार्थाच्या सामान्य प्रवाहात हस्तक्षेप करते.

लक्षणे पुढीलप्रमाणे असू शकतात –

  • डोकेदुखी
  • झटके
  • बोलण्यात अडचण येणे
  • तोल जाणे किंवा चालताना अडचण येणे
  • दृष्टी बाधीत होणे किंवा दृष्टी क्षेत्र मर्यादित होणे

शारिरीक तपासणी, एमआरआय किंवा सीटी स्कॅन, शस्त्रक्रियेतून बायॉप्सी घेणे किंवा मेंदूच्या स्टिरिओटॅक्टिक बायॉप्सीद्वारे मेंदूच्या कर्करोगाचे निदान केले जाऊ शकते.

मेंदूच्या कर्करोगाचे उपचार सहसा गुंतागुंतीचे असतात.

सर्वात विस्तृतपणे वापरले जाणारे उपचार म्हणजे शस्त्रक्रिया, किरणोत्सर्गाची उपचार पद्धती आणि केमोथेरपी.

मेंदूच्या गाठी असलेले अनेक लोक मेंदूची ऑरास्टिरिओटॅक्टिक शस्त्रक्रिया करवून घेतात ज्यामध्ये गाठ काढली जाते.

मेंदूच्या गाठींवर उपचारांसाठी एक अत्याधुनिक केंद्र आहे ज्यामध्ये तज्ज्ञ न्युरो-ऑनकॉलॉजिस्ट, मेंदूचे शल्यविशारद आणि समन्वय साधून उपचार करण्यासाठी प्रगत किरणोत्सर्ग तंत्रज्ञान तसेच रुग्णाला आजारावर मात करून जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करण्यावर केंद्रित असलेले उपचार दिले जातात.

यामध्ये प्रतिमेच्या मार्गदर्शनाखाली, निरोगी मेंदूला तुलनेने वाचवले जाते. न्युरोएंडोस्कोपी ही आणखी एक किमान आक्रमक शल्यक्रियात्मक प्रक्रिया आहे. यामध्ये गाठ काढण्यासाठी कवटीला लहान छिद्रे पाडून, तोंड किंवा नाकावाटे न्युरोसर्जन मेंदूच्या अशा भागापर्यंत पोहोचतात जिथे पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये पोहोचता येत नाही.

किरणोत्सर्ग उपचार पद्धती आणि केमोथेरपी या उपचारांच्या इतर बहुलता आहेत. मेंदूच्या गाठींवर उपचारांसाठी एक अत्याधुनिक केंद्र आहे ज्यामध्ये तज्ज्ञ न्युरो-ऑनकॉलॉजिस्ट, मेंदूचे शल्यविशारद आणि समन्वय साधून उपचार करण्यासाठी प्रगत किरणोत्सर्ग तंत्रज्ञान तसेच रुग्णाला आजारावर मात करून जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करण्यावर केंद्रित असलेले उपचार दिले जातात.

Avatar
Verified By Apollo Neurosurgeon
The content is verified and regulalrly reviewed by our experienced neurosurgeons who ensure that the information provided in AskApollo Health Library upholds the highest standards of medical integrity
Quick Appointment
Most Popular

Importance of Follow Up Care After Cancer Treatment

H3N2 Virus (Influenza A): Symptoms, Diagnosis, Treatment and Spread

Reflex Sympathetic Dystrophy (RSD): Symptoms, Diagnosis & Treatment

Phyllodes Tumor (Breast): Symptoms, Causes, Treatments and Diagnosis

Quick Book
Request A Call Back X
52.172.5.58 - 1