Heart Failure

0
5662
Heart Failure

ह्रदय बंद पडणे – वस्तुस्थिती जाणून घ्या

ह्रदय बंद पडणे म्हणजे काय?

ह्रदय बंद पडणे हा एक वाढत जाणारा विकार आहे ज्यामध्ये रुग्णाची हृदयरक्तवाहिन्यांची कार्यक्षमता कमजोर झाल्यामुळे ह्रदयाला नुकसान पोहोचते. ही सर्वसाधारणपणे जुनाट, दीर्घकालीन स्थिती असते, परंतु कधीकधी ती अचानक विकसित होऊ शकते. ह्रदय बंद पडण्याचे सर्वात सामान्य कारण ह्रदयाच्या रोहिणीचा आजार हे असले तरी, एखाद्या संक्रमणामुळे ह्रदयाचा स्नायू कमजोर होणे, मधुमेहाचा विकार, थायरॉईडची समस्या, अनियंत्रित हायपरटेन्शन, मूत्रपिंड निकामी होणे, सातत्याने ह्रदयाचा ताल वेगवान राहणे आणि कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरली जाणारी काही औषधे यांमुळेही ही स्थिती उद्भवू शकते.

वृद्ध लोकसंख्या वाढत असल्याने ह्रदय बंद पडण्याच्या घटनाही वाढत आहेत. परंतु आज जागरुकता वाढली आहे आणि अधिक चांगल्या नैदानिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ह्रदयाचे अधिक रुग्ण जिवंत राहू शकत आहेत आणि दीर्घायुषी होत आहेत.

ह्रदय बंद पडणे हे ह्रदयविकाराचा झटका येण्यासारखेच असते का?

नाही. ह्रदय बंद पडणे आणि ह्रदयविकाराचा झटका या दोन भिन्न अवस्था आहेत. ह्रदय बंद पडणे हा विकार नाही तर विविध विकृतींमुळे निर्माण होणारी लक्षणे व खुणांच्या एक समूह आहे ज्यामध्ये ह्रदयाच्या झडपेचा, ह्रदयाच्या स्नायूचा, पेरिकार्डिअल (ह्रदयाच्या स्तरातील) विकार तसेच इतर ह्रदयाशी निगडीत नसलेल्या विकारांचा समावेश होतो. ह्रदय बंद पडण्याच्या लक्षणांची सुरुवात आणि तीव्रता अंतर्निहित ह्रदय रोगावर अवलंबून असते.

ह्रदय बंद पडणे किती तीव्र आणि जीवघेणे आहे?

ह्रदय बंद पडणे [तीव्र] असू शकते किंवा कालांतराने हळूहळू (जुनाट) होऊ शकते. ह्रदयाची खालची डावी झडप (डावी जवनिका) डायस्टॉलिक टप्प्यात (जेव्हा ह्रदय शिथील होते आणि त्यामध्ये रक्त भरले जाते) योग्यप्रकारे रक्त भरू शकत नाही तेव्हा शरीरात पाठवले जाणारे रक्त कमी होऊन ह्रदय बंद पडू शकते. जेव्हा डावी जवनिका सामान्यपणे आकुंचित होण्याची आपली क्षमता गमावते तेव्हा सिस्टॉलिक टप्प्यात ह्रदय बंद पडू शकते. ह्रदयाला पुरेसा जोर लावून पंप करता येत नाही आणि त्यामुळे पुरेसे रक्त अभिसरणात पाठवले जात नाही.

जेव्हा तीव्रपणे ह्रदय बंद पडले असेल आणि रुग्णाला अँजायना / ह्रदयविकाराचा झटका किंवा तीव्र उच्च रक्तदाबाचा इतिहास असेल तेव्हा आणीबाणीची स्थिती उद्भवते.

ह्रदय बंद पडण्याची काय लक्षणे आहेत?

पाय, फुफ्फुसे, पोट इत्यादी ठिकाणी द्रव जमा झाल्यामुळे आणि शरीरातील उती व अवयवांची मागणी पूर्ण करण्यासाठी पंप करण्याची ह्रदयाची क्षमता नसल्यामुळे ह्रदय बंद पडण्याच्या बहुतांश लक्षणे व खुणा दिसतात.

ह्रदय बंद पडण्याची काही लक्षणे म्हणजे धाप लागणे, अर्थात श्वसन करताना अस्वस्थ वाटणे किंवा खूप जोरात श्वास घ्यावा लागणे. श्वास फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही.
इतर लक्षणांमध्ये समावेश होतो:
धाप लागणे
श्वास घेणे जड जाणे
छातीत घट्टपणा वाटणे
जीव गुदमरणे
आजाराच्या प्रारंभीच्या स्थितीत श्रम झाल्यावर धाप लागू शकते परंतु, आजार वाढत गेल्यावर आरामाच्या स्थितीमध्येही हे घडू शकते. आडवे झाल्यावर धाप लागू शकते आणि उठून बसल्यावर आराम मिळतो. रुग्ण सहसा सांगतात की रात्री आरामात झोपण्यासाठी त्यांना तीन किंवा चार उशा घ्याव्या लागतात.

यामुळे पॅरोक्सिस्मल नॉक्टमल डिस्प्नीआ (झटक्याने होणारा रात्रीचा श्वासरोध – PND) निर्माण होतो जो सहसा झोप लागल्यावर २-४ तासांनी सुरू होतो. रुग्णांना खूप घाम येतो आणि खोकल्यामुळे धाप लागते, जे सहसा अंथरुणातून उठल्यावर थांबते.

इतर ठळक लक्षणांमध्ये समावेश होतो थकवा आणि प्रयत्नांची क्षमता कमी होते. पोट भरल्यासारखे वाटते, पायांवर सूज येते, मळमळते आणि भूक लागत नाही अशाही तक्रारी रुग्ण करू शकतात.

ह्रदय बंद पडण्याचे निदान कसे केले जाते?

रुग्णांमध्ये कोणतही लक्षणे दिसतात आणि रुग्णाला तपासताना कोणत्या खुणा दिसतात त्यानुसार फिजिशिअन ह्रदय बंद पडल्याचे निदान करतात.

रुग्णाच्या मानेच्या शिरा ठळक असू शकतात, पायांवर सूज असेल, धाप लागलेली असेल किंवा ह्रदयाचे आकारमान वाढले असेल, पायावर सूज आली असेल, यकृत मोठे झाले असेल, घरघर होत असेल इत्यादी.

एकदा का ह्रदय बंद पडल्याच्या चिकित्सिय शंकेची खातरजमा झाली की, ह्रदय बंद पडले आहे याची पुष्टी करण्यासाठी आणि कारणे शोधण्यासाठी ठराविक चाचण्या केल्या जातात. ह्रदय बंद पडल्याचा संशय असलेल्या नवीन रुग्णामध्ये, BNP (ब्रासिन नॅट्रियुरेटिक पेपटाईड) चे मूल्यांकन करण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. जर ते १०० पीजी/मिली याहून जास्त असेल तर, ह्रदय बंद पडणे तीव्र असण्याची शक्यता असते. नेहमीप्रमाणे ईसीजी आणि छातीची क्ष-किरण तपासणी केली जाते आणि इकोकार्डिओग्राम मधून ह्रदयाचे कार्य उघड होते. संप्रेरकांत किंवा चयापचयात काही अडथळा आला आहे का किंवा संक्रमण झाले आहे का यांसारखी उलटवता येणारी कारणे तपासण्यासाठी विशिष्ट नैदानिक चाचण्यांसह, अवक्षेपण घटकांचेही मूल्यांकन केले जाते.

ह्रदय बंद पडणे म्हणजे ह्रदयाचे कार्य प्रत्यक्षात बंद पडले आहे असे नाही. याचा साधा अर्थ म्हणजे ह्रदय कमी क्षमतेने किंवा कमी कार्यक्षमतेने कार्य करत आहे. ह्रदय बंद पडण्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय, शल्यक्रियात्मक आणि प्रगत तंत्रांचा वापर केला जाऊ शकतो. ह्रदय बंद पडणे नियंत्रित करण्यासाठी रुग्णांना ज्या सर्वसाधारण उपाययोजनांचा सल्ला दिला जातो त्या म्हणजे – आराम, मिठाचे सेवन कमी करणे आणि द्रवपदार्थांचे सेवन नियंत्रित ठेवणे.

ह्रदय बंद पडण्यासाठी औषधाच्या उपचारांची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतात –

द्रवांचे वाढलले प्रमाण कमी करणे (डायुरेटिक्स – मूत्रल)
ह्रदयाच्या आतील भरल्यासारखा वाटणारा दबाव कमी करणे (नायट्रोग्लिसेराईन)
ह्रदयावरील ताण कमी करणे (व्हॅसोडायलेटर्स)
ह्रदयाच्या स्नायूची कामगिरी सुधारणे व बळकट करणे (डिगोक्सिन आणि इनोट्रोप्स)
ह्रदयातील विपरीत परिणाम सुधारणे किंवा त्यांस प्रतिबंध करणे (ACE संदमक आणि AT ll अवरोधक)
जिवंत राहण्याची शक्यता सुधारणे, रुग्णालयात दाखल कराव लागण्याची गरज कमी करणे आणि अचानक येणाऱ्या मृत्यूला प्रतिबंध करणे (बीटा ब्लॉकर्स)
डिसरिदमियाला प्रतिबंध करणे (अँटीरायथाइमिक एजंट्स)
रक्ताची गुठळी होण्यास प्रतिबंध करणे (अँटीप्लेटलेट्स, अँटिकॉग्लुअंट्स)

हायपरटेन्शन, मधुमेह आणि हृदयाच्या रोहिणीचा आजार यांवर उपचार करण्यासाठीही गरजेनुसार उपचार केले जातात.

शस्त्रक्रियात्मक उपचारांमध्ये हृदयाच्या रोहिणीची बायपास ग्राफ्ट शस्त्रक्रिया, झडपेची शस्त्रक्रिया, ह्रदयाचे आकारमान पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रिया आणि जिओमेट्री तसेच रोपण करता येणारे हृदयाच्या कप्प्याचे सहाय्यक उपकरण बसविण्याची शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. ह्रदयाचे प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय असतो.

या स्थितीमध्ये पेसमेकरची मदत होते का?

ह्रदय बंद पडलेल्या रुग्णामध्ये ह्रदयाच्या डाव्या व उजव्या जवनिकेचे आकुंचन समक्रमित होत नसल्यास पेसमेकर बसवून (तिहेरी कप्प्याचा पेसमेकर) ते दुरुस्त करता येते ज्यामुळे ह्रदयाचे एकंदर पंपिंग प्रभावीपणा होऊ शकते. ही ह्रदय पूर्ववत समक्रमित करण्याची (कार्डिऍक रिसिन्क्रोनायझेशन) उपचार पध्दती (CRT) लक्षणांपासून आराम देते, जिवंत राहणे सुधारते आणि रुग्णालयात दाखल होण्याची वारंवारिता कमी करते.

ह्रदय बंद पडण्याच्या प्रगत स्थितीत काय होते?

ह्रदय बंद पडण्यावर प्रारंभी जरी औषधांनी उपचार केले जात असले तरी, ज्यांचे मध्यम ते तीव्र ह्रदय बंद पडले आहे त्यांच्याबाबतीत केवळ औषधांचे एकंदर फलानुमान फारसे चांगले नसते. यांपैकी अनेक रुग्णांना फलानुमान आणि जीवनाचा दर्जा या दोन्ही बाबतीत शस्त्रक्रियेच्या पर्यायाचा लाभ होतो. अनेक शस्त्रक्रियात्मक आणि हस्तक्षेपाच्या पर्यायांचा विचार करता येतो.

निष्कर्ष

जर तुमचे ह्रदय बंद पडले असेल तर योग्य काळजी घेतल्यास ह्रदय बंद पडल्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यापासून थांबावे लागत नाही. भविष्याकडे पाहण्याचा तुमचा एकंदर दृष्टिकोन तुमच्या लक्षणांवर, तुमचा ह्रदयाचा स्नायू किती चांगले कार्य करत आहे आणि तुम्ही तुमच्या उपचारांना किती चांगला प्रतिसाद देता आणि त्यांचे पालन करता यावर अवलंबून असते.