HomeVernacular BlogsMarathiGet Ready To Take On The Monsoon Season

Get Ready To Take On The Monsoon Season

Do not ignore your symptoms!

Find out what could be causing them

Start Accessment

पावसाळ्याचा ऋतू अंगावर झेलायला तयार व्हा – निरोगी राहण्यासाठी सूचना

भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यापासून आपली सुटका करण्यासाठी लवकरच पाऊस येईल. तापमानातील बदल जरी हवाहवासा वाटत असला तरी, पाऊस येताना काही त्रासही घेऊन येतो. त्यामुळे अनेकदा फ्लू, खोकला, सर्दी, पचन बिघडणे यांसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच पावसामुळे अचानक माशा आणि डासांचे प्रमाण वाढून आपल्याला मलेरिया, कावीळ, डेंग्यू, अतिसार, टायफॉइड, कॉलरा आणि लेप्टोस्पिरोसिस इत्यादींसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.

तेव्हा आरोग्याच्या या सूचनांचे पालन करून पावसाळ्यात सतर्क राहा व काळजी घ्या.

  • बाहेरील पदार्थ खाऊ नयेत
    सँडविच, भजी,वडे, पाणीपुरी इत्यादींसारख्या पदार्थांमधील जिवाणू अपचनाला निमंत्रण देतात त्यामुळे रस्त्यावरील पदार्थांपासून दूर राहा. कापून ठेवलेल्या किंवा कच्च्या पदार्थ/फळांपासून दूर राहा कारण त्यामध्ये असलेल्या जंतूंमुळे वीषबाधा होऊ शकते. बाहेर कधीही पाणी पिऊ नये कारण दूषित आणि अशुद्ध पाण्यामुळे कॉलरा, अतिसार इत्यादींसारखे पाण्यात उद्भवणारे आजार होऊ शकतात.
  • हिरवी आणि रंगीत फळे आणि भाज्यांचे सेवन करा
    पौष्टिक आहार घेण्यासाठी आणि पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी हिरवी आणि रंगीत फळे व भाज्यांचे सेवन अनिवार्य आहे. तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि या आजारास प्रवण ऋतूमध्ये तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी यांतून पोषक घटक मिळतात. परंतु, या ऋतूमध्ये फळे आणि भाज्या (विशेषतः कोशिंबिरींमध्ये वापरण्याच्या) धुताना विशेष काळजी घ्यावी. मीठ टाकलेल्या कोमट पाण्याने फळे व भाज्या धुवून त्यावरील घाणा काढून टाकणे सर्वात चांगले.
  • खोलीच्या तापमानाला साठवलेले किंवा वाढले जाणारे पदार्थ टाळावे
    खोलीच्या तापमानाला साठवलेले किंवा वाढले जाणारे पदार्थ टाळावे. वाफाळलेले पदार्थ खाणे उत्तम. अतिशय उत्तम रेस्टॉरंटमध्ये वाढले जाणारे पदार्थ सुद्धा सुरक्षित असतील याची हमी नसते तेव्हा रस्त्यावरील विक्रेत्यांकडील पदार्थ तर नक्कीच टाळावे कारण ते दूषित होण्याची शक्यता जास्त असते. वीज गेलेली असताना रेफ्रिजरेटर आणि फ्रीजरची दारे बंद ठेवावी ज्यायोगे ८ तासांपर्यंत अन्न ताजे राहू शकेल.
  • डास होऊ देऊ नयेत
    पावसाळा सुरू होताच घराच्या आसपास पाणी साठायला सुरुवात होत असल्याने यांची उत्पत्ती सुरू होते. अंथरुणाशेजारी डासांच्या उदबत्त्या लावून झोपण्यापेक्षा मच्छरदाण्या आणि खिडक्या व दरवाजांना डासांच्या बारीक जाळ्या लावणे चांगले.

    अंगभर कपडे घालून शिवाय शरीराच्या उघड्या भागावर डास न चावण्यासाठीचे क्रीम लावणेही चांगले असते.

  • घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ आणि किटाणूमुक्त ठेवा
    तुमचे घर कीटकांपासून मुक्त ठेवा. कुठे पाणी तुंबत किंवा गळत नाही ना ते पाहा. पाण्याचे कूलर, फुलदाण्या आणि इतर ठिकाणी पाणी भरून ठेवलेले नाही ना ते पाहा. त्यामुळे डासांना अंडी घालण्यास प्रतिबंध होईल आणि तुमचे डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होईल.

    पाण्याच्या टाक्या आणि इतर जलस्रोतांपासून डासांना दूर ठेवणे हा डास नियंत्रित ठेवण्याचा योग्य दृष्टिकोन आहे. एवढेच नाही तर, फुटके डबे, मडकी यांमध्ये तसेच पाण्याच्या टाक्यांखाली किंवा नळांखाली पाणी साठू देऊ नये कारण येथेच डास अंडी घालतात. बहुतांश डासांच्या जाती त्यांना अंडी घालण्यास योग्य अशा जागांच्या आसपास राहतात.

  • पाणी प्या आणि शरीरात पाण्याची पातळी राखा
    हवामान थंड असले तरीही पावसाळ्यात भरपूर पाणी प्या. आर्द्रता जास्त असल्यामुळे आपल्याला फारसा घाम येत नाही त्यामुळे भरपूर पाणी पिऊन शरीरातील दूषित द्रव्ये बाहेर टाकणे महत्त्वाचे असते.

    तथापि, तुम्ही पीत असलेल्या पाण्याबाबत अतिशय काळजी घ्या कारण पावसाळ्यातील बहुतांश आजार हे पाण्यामुळे होतात. धोकादायक जंतू मारण्यासाठी आणि इतर अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी तुम्ही पाणी उकळून पिऊ शकता. स्वच्छ उकळलेले पाणी प्या आणि शक्य असल्यास बाटलीबंद पाणी प्या.

  • पावसात भिजलात? लगेच अंघोळ करा
    या ऋतूमध्ये त्वचेची आणि बुरशीजन्य संक्रमणे होणे सामान्य असते त्यामुळे शरीर निर्जंतुक करण्यासाठी छान गरम पाण्याने अंघोळ करा. स्वतःला संक्रमणापासून मुक्त ठेवण्यासाठी वनौषधीयुक्त शॉवर जेल वापरा.
  • टायफॉइड आणि हिपॅटायटीस ए करिता लशीकरण
    पावसाळ्यात सामान्यपणे टायफॉइड आणि हिपॅटायटीस ए ची साथ येते. या आजारांना प्रतिबंध करण्यास आणि ते नियंत्रित करण्यास मदत करणारी सार्वजनिक आरोग्याची ध्येये, अर्थात सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि पुरेशी वैद्यकीय निगा साध्य करणे अवघड असू शकते. त्यामुळे, काही तज्ज्ञांना वाटते की हे आजार नियंत्रित करण्यासाठी खूप जास्त जोखीम असलेल्या लोकसंख्येमध्ये लशीकरण करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. टायफॉइडचा ताप आणि हिपॅटायटीस ए ची जास्त जोखीम असलेल्या प्रदेशात जात असाल तर लस घेण्याची शिफारस केली जाते.
  • घरात व्यायाम करा
    पावसाळ्यात घरात किंवा व्यायामशाळेत व्यायाम करावा. जर तुमच्या व्यायामात जॉगिंग किंवा चालण्याचा समावेश असेल तर त्याऐवजी पिलेट्स, योगासने किंवा इतर मुक्त व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
  • तुमच्या डोळ्यांचे रक्षण करा
    मळलेल्या हातांनी चेहरा व डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. कोमट पाणी आणि जंतुनाशक साबणाने वारंवार हात धुवा. जेव्हा पाणी उपलब्ध नसेल तेव्हा हात निर्जंतुक करण्यासाठी अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर जवळ बाळगा. यामुळे तुम्ही डोळे येणे (कन्जक्टिवायटिस) इत्यादींसारख्या डोळ्याच्या सामान्य समस्यांपासून दूर राहाल.

थोडक्यात म्हणजे –

  • रस्त्यावरील पदार्थ किंवा जंक फूड टाळा.
  • जर तुम्हाला बाहेर जेवावेच लागले तर चांगले उकळलेले आणि शिजवलेले पदार्थ खा.
  • रेस्टॉरंट्स किंवा हॉटेलांमध्ये नेहमीचे पाणी घेणे टाळा. पावसात भिजल्यास, संक्रमणे टाळण्यासाठी त्वरित अंघोळ करा.
  • आहारात भरपूर भाज्या आणि फळांचा समावेश करा आणि खाण्यापूर्वी ती नीट धुतलेली असल्याची खात्री करा.

तेव्हा, पौष्टिक आहार आणि निरोगी जीवनशैलीसह हा पावसाळा तुमच्यासाठी आणि तुमच्या आप्तांसाठी खरोखरच जादुई बनवा.

Quick Appointment
Most Popular

Breast Cancer: Early Detection Saves Lives

Do Non-smokers Get Lung Cancer?

Don’t Underestimate the Risk: The Truth About Sudden Cardiac Arrest in Young People

Life after One Year Coronary Artery Bypass Graft (CABG) Surgery: A Journey of Recovery and Renewed Health.

Book ProHealth Book Appointment
Request A Call Back X
52.172.5.58 - 1